मुंबई, 06 जानेवारी : टीव्हीची सुपरहिट मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे 5 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकली. मराठी नंतर हिंदी टीव्ही मालिका ‘मे आय कम इन मॅडम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नेहानं तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंहशी लग्न केलं. दोघं मागच्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. शार्दुल सिनेसृष्टीतील नसल्याचंही नेहाने याआधी सांगितलं. नववर्षाच्या सुरुवातीला नेहा महाराष्ट्रीयन पद्धतीनं शार्दुल सिंहशी लग्नाच्या बेडीत अडकली. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल तर झालेच मात्र त्यापेक्षाही जास्त चर्चेत राहिला तो तिनं घेतलेला उखाणा. महाराष्ट्रात लग्नप्रसंगी उखाणा हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो आणि हा विधी तितकाच गंमतीशीरही आहे. नेहा पेंडसे नुकतीच महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्नाच्या बेडीत अडकली. यावेळी तिनं घेतलेल्या भन्नाट उखाण्याचा व्हिडीओ तिचा मित्र अभिजित खांडकेकरनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेहानं घेतलेला उखाणा- चांदीच्या ताटात फणसाचे गरे… शार्दुलराव आहेत बरे… पण वागतील तेव्हा खरे…नेहाचा हा उखाणा ऐकल्यावर तिचा नवराही लाजला. ‘या’ बॉलिवूड सेलिब्रेटींनी घटस्फोटानंतर लगेचच दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ!
नेहाच्या या उखाण्यानंतर उपस्थितांनाही हसू आवरेनासं झालं. नेहानं तिच्या लग्नात गुलाबी रंगाची पारंपरिक नऊवारी साडी नेसली होती. त्यावर डिझानर ब्लाऊस, नाकात नथ, गळ्यात महाराष्ट्रीयन पद्धतीचे पारंपरिक दागिने असा नेहाचा लुक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. तिच्या लग्नाला बऱ्याच मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. कंगना रणौतनं आता घेतला सलमानशी ‘पंगा’, दबंग खान ओरडून म्हणाला…
नेहा मागच्या वर्षी बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये दिसली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या लग्नाची घोषणा केली होती. मी माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी लग्न करणार असल्याचं तिनं यावेळी सांगितलं होतं. या सुंदर कुटुंबाची सदस्य होत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर क्षण आहे असं देखील नेहा म्हणाली होती. नेहानं मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिनं नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नीनं केला धक्कादायक खुलासा