मुंबई 6 जून: तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे.गेली १४ वर्ष या मालिकेइतकं यश आणखी कोणत्याच मालिकेला मिळाल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. या मालिकेतून एक एक कलाकार काढता पाय घेत असताना एक खूप मोठी आनंदाची बातमी प्रेक्षकांसाठी समोर येत असल्याचं समजत आहे. ही मालिका नेटाने बघणाऱ्या प्रेक्षकांना एकच प्रश्न सतावत आहे तो म्हणजे दयाबेनची एंट्री मालिकेत कधी होणार? या मालिकेत दयाबेन कधी परतणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानी मालिकेतून अनेक वर्ष गायब आहे. लग्न आणि संसारात लक्ष देण्यासाठी दिशाने काही काळ मालिकेतून ब्रेक घेत आपल्या पहिल्या अपत्याचं स्वागत केलं होतं. त्यानंतर दिशांच्या येण्याबद्दल अनेकदा चर्चा झाली, त्यावर अनेक प्रश्नउत्तर झाली मात्र दिशांची मालिकेत येण्याबद्दल काही चिन्ह दिसत नव्हती. दिशाची या पात्रातून रिप्लेसमेंट केली जाईल आणि नवीन दयाबेन प्रेक्षकांसमोर येईल अशी माहितीसुद्धा देण्यात आली असं सांगितलं जात होतं. हे सगळं बाजूला ठेवत तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या नव्या प्रोमोने सध्या खळबळ उडवली आहे. यातून असं स्पष्ट होत आहे की दयाबेन अखेर मालिकेत परत येणार असून (Dayaben Returns in TMKOC) त्या संदर्भात दाखवला जाणारा नवा प्रोमो प्रचंड पसंत केला जात आहे. टप्पू के ‘पापा हा तिचा खास अंदाजातला डायलॉग, विचित्र पण दिलखुलास हसू, गरबा खेळण्याची हौस, नवरा जेठालालच्या खोड्या काढण्याची सवय आणि बरंच काही पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याने प्रेक्षक खुश आहेत. गेले अनेक दिवस बंद असलेलं जेठालालचं गडा इलेक्रॉटिक्स पुन्हा सुरु होत असल्याचं आता समोर येत आहे. आणि या दुकानाच्या उदघाटनाला दयाबेन येणार असा इशारा सुंदरलाल जेठालाशी बोलताना देतो असं यात दाखवल आहे. दुकानाचं रिओपनिंग दयाबेनच्या हस्ते होणार आहे अशी माहिती जेठालाल देतो. सर्व गोकुळधाम सोसायटीचे रहिवासी या बातमीने खुश होतात असं चित्र प्रोमोमध्ये दिसत आहे. मात्र ट्विस्ट असा आहे की पंडितजी दुकानाच्या ओपनिंगच्या वेळी कोणीतरी गडबड करू नका असा सल्ला प्रोमोमध्ये देताना दिसत आहेत. मुहूर्त चुकला तर सात महिने वाट पाहावी लागेल असा इशारा ते देतात. त्यामुळे या वेळेला दयाबेन मुहूर्त साधू शकणार का? आणि तिचं मुखदर्शन करायला मिळणार का हा प्रश्न समोर येत आहे.
अनेकदा hype तयार करण्यासाठी दयाबेन परतण्याची हुलकावणी देण्यात आली आहे. या वेळेला तरी खरंच दयाबेन दुकानाच्या रिओपनिंगला येणार का तिला पहाण्याची इच्छा अपुरीच राहणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. हे ही वाचा- ‘ सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.’ IIFA पार्टीतील ‘त्या’ ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल अशीही शंका वर्तवली जात आहे की बहुधा हा एक नवा बनाव आहे किंवा दिशा वकानीला या भूमिकेतून रिप्लेस केलं आहे. कारण दिशाने नुकतंच एका अपत्याला जन्म दिला आहे. एवढ्या कमी कालावधीत ती मालिकेत परतणार का असा प्रश्न समोर येतो आहे. दिशाने मागे जेव्हा मालिका सोडली तेव्हा तिला परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्यावर तिचा वतीने केलेल्या काही मागण्या आणि अन्य कारणांनी निर्मात्यांना तिला परत आणण्याचा मोह टाळावा लागला होता. काही काळापूर्वी दिशाला रिप्लेस करण्याबद्दल सुद्धा निर्मात्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. हे ही वाचा- ‘तारक मेहतां’ना परत आणण्यासाठी निर्मात्यांची धावपळ, कलाकारांनीही कसली कंबर
या मालिकेतून नुकतीच तारक मेहता पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी एक्झिट घेतली. काही व्यावसायिक कारणांनी त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना परत आणण्यासाठी निर्माते कसून प्रयत्न करत आहेत.
या वेळी तरी प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये आणि त्यांना जेठाला-दयाबेन या गोड जोडीला पुन्हा बघता यावं अशी आशा फॅन्स व्यक्त करत आहेत.