जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तारक मेहतां'ना परत आणण्यासाठी निर्मात्यांची धावपळ, कलाकारांनीही कसली कंबर

'तारक मेहतां'ना परत आणण्यासाठी निर्मात्यांची धावपळ, कलाकारांनीही कसली कंबर

'तारक मेहतां'ना परत आणण्यासाठी निर्मात्यांची धावपळ, कलाकारांनीही कसली कंबर

अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका सोडल्यामुळे त्यांचे फॅन्स खूप निराश झाले आहेत

    मुंबई, 6 जून : अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका सोडल्यामुळे त्यांचे फॅन्स खूप निराश झाले आहेत. त्यामुळे या मालिकेच्या  निर्मात्यांनी लोढा यांना परत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शैलेश लोढा म्हणजेच तारक मेहतांच्या कथांशिवाय निर्मात्यांना मालिकेची ओळख टिकवणं कठीण जात आहे. ‘ई टाइम्स’च्या टीव्ही रिपोर्टनुसार, निर्माते असित मोदींनी (Asit Modi) शैलेश लोढा यांना शोमध्ये आणण्यासाठी अनेक वेळा संपर्क केला आहे; पण लोढा माघार घेण्यासाठी तयार नाहीत. इतकंच काय तर मालिकेतील अनेक कलाकारही त्याच्यापर्यंत पोहोचून मध्यस्थी (Mediation) करण्याचा प्रयत्न करत असून त्यांनाही अद्याप यश आलेलं नाही. काय आहे अडचण? शैलेश लोढा यांनी बऱ्याच दिवसांपासून चित्रीकरण (Shooting) थांबवलं आहे. पण, त्या मागचं कारण समोर आलेलं नव्हतं. लोढा यांनी मालिका का सोडली याबाबत अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. मालिकेतील प्रमुख पात्र जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) आणि शैलेश लोढा यांच्यातील संबंध चांगले नसल्याची चर्चा आहे. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रसारित होत असूनही शैलेश यांना समाधानकारक महत्त्व मिळत नसल्यामुळे ते नाखूश असल्याचा दावाही केला जात आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’तील अनेक कलाकारांनी शैलेश यांच्याविरोधात गटबाजी केली आहे, असंही सांगितलं जात आहे. शैलेश पुन्हा येणार! ईटाइम्सने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आपण शैलेश लोढा यांचं मन वळवू अशी असित मोदी यांना आशा आहे. परंतु, लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की, यापूर्वी दिशा वकानी (Disha Vakani), गुरचरण सिंग आणि नेहा मेहता यांना शोमध्ये परत आणण्यात मोदींना यश आलं नव्हतं. Happy Birthday Nivedita Saraf: चिडीचूप बुकस्टोरमध्ये निवेदिता सराफ यांनी का मारली होती जोरदार शिट्टी बोलण्यास नकार निर्माते असित मोदी यांना शैलेश लोढा परत येणार नाहीत याची खात्री झाल्यानंतर ते  या भूमिकेसाठी ऑडिशन्स सुरू होऊ शकतात. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शैलेश यांनी ‘तारक मेहता’ सोडण्याच्या निर्णयाबद्दल माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा वाद मिटून शैलेश पुन्हा मालिकेत दिसतात का हे बघावं लागेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात