Home /News /entertainment /

'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' मध्ये नाही परतणार दयाबेन! मालिकेला दिशा वकानीने केलं अलविदा?

'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' मध्ये नाही परतणार दयाबेन! मालिकेला दिशा वकानीने केलं अलविदा?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये दयाबेन (Dayaben) ची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) च्या पुनरागमनाची प्रतीक्षा अनेक चाहते करत आहेत. मात्र प्रेक्षकांची निराशा होण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 23 मार्च: गेल्या 12 वर्षांपासून प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  सेटवरून एक वाईट बातमी समोर येते आहे. मालिकेतील दयाबेन (Dayaben) म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीच्या (Disha Vakani) एन्ट्रीची चाहते दीर्घकाळ वाट बघत आहेत, पण कदाचित आता प्रेक्षकांची निराशा होणार आहे. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने या शोमध्ये परत जाण्यास नकार दिला आहे. दिशा वकानीने 2019 मध्ये या शोमधून मॅटरनिटी ब्रेक घेतला होता आणि तेव्हापासून 'तारक मेहता ...' मध्ये तिने पुनरागमन केले नाही. एका न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, मालिकेत परतण्यासाठी मेकर्सनी दिशाशी तिच्या मॅटरनिटी ब्रेकनंतर बातचीत केल्याची सूत्रांची माहिती आहे.  तिच्या एन्ट्रीसाठी योग्य वेळ आणि कथा देखील निश्चित केली जात होती. दरम्यान निर्मात्यांनी दिशा वकानी हिच्याशी इतर काही गोष्टींबद्दल देखील चर्चा केली होती. पण ही सर्व चर्चा निष्फळ ठरल्याचेच चित्र आहे. याच कारणास्तव दिशाने 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ला कायमचा निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. (हे वाचा-मराठी चित्रपटांचा धुमाकूळ; बार्डोनंतर ‘आनंदी गोपाळ’नं पटकावला राष्ट्रीय पुरस्कार) 2019 मध्ये दिशा वकानी अर्थात दयाबेनने या कार्यक्रमासाठी एक सीन शूट केला होता. या सीनमध्ये ती तिच्या कुटुंबीयांशी म्हणजेच जेठालाल, मुलगा आणि गोकुळधामच्या इतर शेजार्‍यांशी फोनवर बोलताना दाखवली होती. यामध्ये दयाबेनने लवकरच गोकुळधाममध्ये परत येईल असे सर्वांना आश्वासन दिले होते, मात्र आता असे होताना दिसत नाही आहे. (हे वाचा-National Film Awards: अभिनेत्री पल्लवी जोशी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर) या प्रसिद्ध मालिकांव्यतिरिक्त दिशा काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. दिशाने  देवदास, जोधा अकबर, लव स्टोरी 2050, C Kkompany या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र तिला विशेष प्रसिद्धी TMKOC ने दिली. या मालिकेआधी दिशाने एक अभिनेत्री म्हणून ओळख बनवण्यासाठी खूप स्ट्रगल केला होता. या दरम्यान तिने काही बी-ग्रेड सिनेमांमध्ये देखील काम केले होते. अभिनेत्रीने 1997 मध्ये आलेल्या फिल्म ‘कमसिन: द अनटच्ड’ या सिनेमात काही बोल्ड सीन दिले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Disha vakani, Entertainment, Taarak mehta ka ooltah chashma, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv actress, Tv serial

    पुढील बातम्या