मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

National Film Awards: अभिनेत्री पल्लवी जोशी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

National Film Awards: अभिनेत्री पल्लवी जोशी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मराठी अभिनेत्री आणि सूत्रसंचालक पल्लवी जोशी यांनी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. 'द ताश्कंद फाईल्स' या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेसाठी पल्लवी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 मार्च : आज सोमवारी दिल्लीत 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 2019 मध्ये कलाविश्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना, कलकृतींसाठी आज पुरस्कार जाहीर करण्यात आले. National Films Awards 2019 मध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारल्यानंतर आता मराठमोळ्या अभिनेत्रीलाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी अभिनेत्री आणि सूत्रसंचालक पल्लवी जोशी यांनी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.

'द ताश्कंद फाईल्स' या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेसाठी पल्लवी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरील प्रश्नांवर आधारित हा चित्रपट आहे.

(वाचा - मराठी चित्रपटांचा धुमाकूळ; बार्डोनंतर ‘आनंदी गोपाळ’नं पटकावला राष्ट्रीय पुरस्कार)

(वाचा - कंगना ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; या चित्रपटांसाठी पटकावला राष्ट्रीय पुरस्कार)

वर्षभरात प्रदर्शित झालेल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मनोरंजन सृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं गेल्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा एक वर्षानंतर साजरा केला जात आहे. 2019 साठीच्या पुरस्कारांची (67th National Film Awards) घोषणा आज करण्यात आली. राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात हा सोहळा पार पडला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून बार्डोने पुरस्कार पटकावला. त्यानंतर ‘आनंदी गोपाळ’ (Anandi Gopal) या चित्रपटाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांच्या विभागात ‘आनंदी गोपाळ’नं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. सोबतच सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनसाठी देखील या चित्रपटाला पुरस्कृत करण्यात आलं आहे.

First published:

Tags: National film awards