जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / डेव्हिड वॉर्नरने बायको आणि मुलीबरोबर केला थेट प्रभुदेवाशी मुकाबला! पाहा VIDEO

डेव्हिड वॉर्नरने बायको आणि मुलीबरोबर केला थेट प्रभुदेवाशी मुकाबला! पाहा VIDEO

डेव्हिड वॉर्नरने बायको आणि मुलीबरोबर केला थेट प्रभुदेवाशी मुकाबला! पाहा VIDEO

बॉलिवूड गाण्यावर डान्स करतानाचा वॉर्नरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. अनेकांनी सोशल मीडियाला विरंगुळ्याचं साधन बनवलं आहे. अशात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचे भारत आणि बॉलिवूड प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललेलं पाहायला मिळत आहे. आयपीलएमध्ये हैदराबादकडून खेळणारा वॉर्नर सोशल मीडियावर सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा बाहुबलीवाला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता आणखी एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करतानाचा वॉर्नरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. डेव्हिड वॉर्नर मागच्या काही दिवसांपासून टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. मागच्या काही दिवसांत त्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात आता नव्या टिकटॉक व्हिडीओसह डेव्हिड चाहत्यांच्या भेटीला आला आहे. त्यानं या व्हिडीओमध्ये बॉलिवूड सुपरस्टार प्रभूदेवाचं आयकॉनिक साँग ‘मुकाबला’वर बायको आणि मुलीसोबत डान्स केला. एवढंच नाही तर त्यानं या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टीला सुद्धा टॅग केलं आहे. बिग बींसोबत काम करण्यापेक्षा आर्चीसाठी ही गोष्ट महत्त्वाची, वाचून कराल कौतुक

जाहिरात

याआधी डेव्हिड वॉर्नरनं बाहुबलीचा वेश करुन या सिनेमातला डायलॉग म्हटला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. एवढंच नाही तर या व्हिडीओवरुन भारतीय क्रिकेटर सुरेश रैना आणि इरफान पठाण यांनीही त्याची फिरकी घेतली होती. त्याचा व्हिडीओ चहल पेक्षाही फनी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

वॉर्नर सध्या कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. यासोबतच तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय झाला आहे. त्याचे बॉलिवूड गाण्यांचे टिकटॉक व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसत असतात. वॉर्नरचा भारतातही मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी कुटुंबासह 14 दिवसांसाठी क्वारंटाईन, कोरोना टेस्ट… ‘फँड्री’मधल्या जब्याची ‘शालू’ आता झालीय एवढी मॉडर्न, PHOTOS पाहून व्हाल थक्क

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात