वयाच्या केवळ अकराव्या वर्षी त्यानं आर्थिक अडचणीमुळे कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीचा अनुभव घेतला आहे. बालपणातला हा अनुभव तो आजही विसरू शकत नाही. सुपरस्टार जॅकी श्रॉफ आणि आएशा श्रॉफ यांचा मुलगा असलेला टायगर जन्माला आला तो तोंडात चांदीचा चमचा घेऊन; पण नंतर मात्र काही काळासाठी ओढवलेल्या बिकट परिस्थितीचाही त्यानं सामना केला. जीक्यू मॅगझिनशी बोलताना त्यानं ही आठवण सांगितली. 2003 मध्ये त्याची आई आयशा श्रॉफ यांनी ‘बूम’ नावचा चित्रपटाची निर्मिती केली होती. कतरिना कैफ हिचा हा पहिला चित्रपट होता. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काळ्या बाजारात उपलब्ध झाला आणि बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला. त्यामुळं झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानामुळं आयशा आणि जॅकी श्रॉफ यांना आपलं बांद्रयातील घर विकावं लागलं आणि खारला रहायला जावं लागलं. त्या वेळी टायगर केवळ 11 वर्षांचा होता. एकेक करून घरातलं सगळं फर्निचर, आईची पेंटिंग्ज, दिवे सगळं विकावं लागलं. एक दिवस टायगरचा बेडही विकावा लागला. जमिनीवर झोपावं लागलं. ज्या वस्तू बघत बघत तो मोठा झाला त्या सगळ्या आपल्या डोळ्यांसमोर विकल्या गेलेल्या त्यानं पाहिल्या. त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता. टायगर श्रॉफ म्हणतो, हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मला खूप वाईट वाटत होतं. परिस्थिती सुधारण्यासाठी काम करण्याची माझी इच्छा होती, पण मला माहीत होतं की मी काही करू शकत नाही. बालपणीच असा अनुभव घेतलेल्या टायगरचे पाय म्हणूनच आजही जमिनीवर आहेत. (हे वाचा - आता सैनिकाच्या भूमिकेत दिसणार कंगना रणौत; 'या' चित्रपटाची जोरदार चर्चा) श्रद्धा कपूरबरोबर टायगर श्रॉफनं केलेला बागी चित्रपट हिट झाला होता. त्यानंतर ए फ्लाईंग जट्ट, बागी-3, स्टुड्न्ट ऑफ द इयर -2 आणि वॉर या चित्रपटांत त्यानी काम केलं आहे. वॉरमध्ये टायगरनं अभिनेता हृतिक रोशनबरोबर काम केलं आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. आता तो 2014 मधील हॉलिवूड चित्रपट रॅम्बोच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. तसंच तो हिरोपंतीचा सिक्वल ‘हिरोपंती 2’ मध्ये ही दिणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.