आता सैनिकाच्या भूमिकेत दिसणार कंगना रणौत; 'या' चित्रपटाची जोरदार चर्चा

आता सैनिकाच्या भूमिकेत दिसणार कंगना रणौत; 'या' चित्रपटाची जोरदार चर्चा

दिग्दर्शक सर्वेश मेवाडा दिग्दर्शित या चित्रपटात कंगना रनौत भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 1 मार्च: ‘धाकड’ चित्रपटाच चित्रीकरण संपवून कंगना रनौतने आता आपल्या नव्या प्रोजेक्टकडे मोर्चा वळवला आहे. कंगनाने नुकताच सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे खुलासा केला आहे की, तिने आगामी चित्रपटाच्या लूक टेस्टने शूटिंग सुरू केली आहे. ‘तेजस’ असं या चित्रपटाच नावं आहे.

या चित्रपटात कंगनाचा रोल एका शीख सैनिकाचा असणार आहे. कंगनाने नुकताच एका मुलाखतीमध्ये खुलासा करताना सांगितलं की तिला तिच्या या पात्राबद्दल अजून कल्पना नव्हती. तिने तिच्या या पात्राच्या वर्दीचा फोटो शेअर करताना सांगितलं की आज या वर्दीवरचं पूर्ण नाव वाचेपर्यंत मला माझ्या पात्राबद्दल काहीच कल्पना नव्हती. आणि हे नावं वाचताच माझ्या चेहऱ्यावर नकळत लगेच एक हसू उमटलं.

या महिन्यात ‘तेजसच्या’ शुटींगला सुरुवात होईल. कंगनाचा वाढदिवस देखील याचं महिन्यात 23 तारखेला आहे. दिग्दर्शक सर्वेश मेवाडाच्या या चित्रपटात कंगना रनौत भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

अवश्य वाचा -   सर्जरीनंतर अभिताभ बच्चननं शेअर केला फोटो; म्हणाले 'आपलं अस्तित्व म्हणजे दयाहीन गुंता'

‘तेजस’साठी रोनी स्क्रूवालाच्या RSVP ने फायनान्स केलं आहे. तिच्या या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना कंगनाने सांगितलं की तिला विश्वास आहे की हा चित्रपट तरुणांमध्ये देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करेल. ‘धाकड’ शिवाय कंगनाकडे अजून जयललिता यांची बायोपिक 'थलाइवी' आणि मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ डिड्डा सारखे प्रोजेक्ट्स आहेत. कंगनाने 'थलाइवी'चं  शूटिंगही पूर्ण केलं आहे.

Published by: Aditya Thube
First published: March 1, 2021, 10:50 PM IST

ताज्या बातम्या