जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘माझ्या नावाचा वापर करणं थांबव नाहीतर...’ नेहा कक्करनं एक्स बॉयफ्रेंडला दिली ताकीद

‘माझ्या नावाचा वापर करणं थांबव नाहीतर...’ नेहा कक्करनं एक्स बॉयफ्रेंडला दिली ताकीद

‘माझ्या नावाचा वापर करणं थांबव नाहीतर...’ नेहा कक्करनं एक्स बॉयफ्रेंडला दिली ताकीद

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हिमांशनं, नेहासोबच्या ब्रेकअपबद्दल मला सर्वांसमोर खलनायक म्हणून दाखवण्यात आलं असं म्हटलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी : प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप याबद्दल आता सर्वांनाच माहित आहे. नेहा आणि हिमांश एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रेमाची झलक अनेकदा पाहयला मिळाली. पण या दोघांमध्ये काही कारणानं वाद झाले आणि दोघंही वेगळे झाले. पण यामुळे नेहा खूप दुखावली गेली होती. एवढंच नाही तर इंडियन आयडॉल 11 च्या मंचावर सुद्धा ती रडली होती. नुकतीच हिमांशनं त्यांच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ज्यामुळे आता नेहानं त्याला ती आणि तिच्या कुटुंबापासून दूर राहा असा इशारा दिला आहे. नेहा कक्कर सध्या इंडियान आयडॉल 11 मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीनं नुकतीच बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी त्यानं नेहानं त्याला कशाप्रकारे सर्वांच्या समोर खलनायक म्हणून दाखवलं याविषयी सांगितलं. पण आता यावर नेहानं सोशल मीडियाच्या माध्यमातून हिमांशचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. नेहानं तिच्या पोस्टमध्ये हिमांशनं ती आणि तिच्या कुटुंबापासून दूर राहावं असा इशाराच देऊन टाकला आहे. तिची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत असून त्याला 22.37 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. हुंड्याने घेतला गायिकेचा बळी, सासरच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या नेहानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘जे लोक वाईट बोलतात. ते माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत. पण ते खोटे आणि माझ्यावर जळणारे आहे. हे लोक चर्चेत येण्यासाठी माझ्या नावाचा वापर करत आहेत. असं अगोदरही झालं आहे आणि आताही माझ्या मागून माझ्या नावाचा वापर केला जात आहे. तुमच्या कामातू प्रसिद्धी मिळावा माझ्या नावाचा वापर करुन नको.’ फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री होती सुपरस्टार! पण 15व्या वर्षीच झाला मृत्यू

जाहिरात

नेहानं पुढे लिहिलं, ‘जर मी बोलायला लागले तर तुझी आई, बाबा आणि बहीण सर्वांचं वागणं जगाच्या समोर येईल. त्यांनी माझ्यासोबत जे केलं मला जे काही बोललं. ते सर्व मी जगाला सांगेन. माझ्या नावाचा वापर करण्याची हिंमत करु नकोस. जगासमोर मला खलनायिका बनवून तू बिचारा होण्याचा प्रयत्न करु नकोस. हा इशारा आहे. मी, माझं नाव आणि माझ्या कुटुंबापासून दूर रहा.’ ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिताने पुन्हा शेअर केला HOT फोटो, चाहते घायाळ बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हिमांशला त्याच्या ब्रेकअप बद्दल विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, ‘जेव्हा हे घडलं तेव्हा ते तेवढं वाईट नव्हतं. जेवढं लोकांना याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केल्यावर झालं. आज माझ्या आयुष्यात सर्व काही सुरळित सुरू असलं तरीही हे तो काळ माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता. पण आता अशी वेळ आली आहे की संपूर्ण जग मला दूषणं देत आहे. 2018च्या शेवटी आम्ही वेगळे झालो. नेहानं याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. खरी गोष्ट कोणालाच माहित नाही त्यामुळे सर्वांनी मला खलनायक मानलं आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात