जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Dabangg 3 : सलमान खान पडणार अर्ध्या वयाच्या सईच्या प्रेमात; महेश मांजरेकरांची आहे मुलगी

Dabangg 3 : सलमान खान पडणार अर्ध्या वयाच्या सईच्या प्रेमात; महेश मांजरेकरांची आहे मुलगी

Dabangg 3 : सलमान खान पडणार अर्ध्या वयाच्या सईच्या प्रेमात; महेश मांजरेकरांची आहे मुलगी

दबंग3 येत्या डिसेंबरमध्ये रीलिज होईल. यामधून महेश मांजरेकरांची मुलगी सई पदार्पण करत आहे. सलमान आणि सोनाक्षी सिन्हा काय सांगतायत सईबद्दल वाचा…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै :  सलमान खानच्या दबंग सिनेमाचा तिसरा सीक्वेल लवकरच येत आहे. यामध्ये सलमान खानबरोबर महेश मांजरेकरांची मुलगी सई दिसणार आहे. सई ही महेश मांजरेकरांची दुसरी मुलगी. सुरुवातीला त्यांची मोठी मुलगी आणि सहदिग्दर्शक म्हणून वडिलांना असिस्ट करणारी अश्वमी मांजरेकर दबंगमधून पडद्यावर प्रवेश करणार असं म्हटलं जात होतं. पण स्वतः महेश मांजरेकरांनीच त्याबाबत स्पष्टीकरण दिलं. अश्वमी नव्हे, तर सई सलमान खानची तरुणपणची प्रेयसी म्हणून दबंग 3 मध्ये दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा या सिनेमातही सलमानची म्हणजे चुलबूल पांडेची पत्नी रज्जो म्हणून दिसणार आहे. ‘भारत’च्या तगड्या यशानंतर अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘दबंग 3’मध्ये सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रज्जो आणि अरबाज खान मक्खनचंदच्या भूमिकेत दिसणार आहेत. हे ही वाचा : ‘थ्री इडियट्स’च्या या अभिनेत्याला 18 वर्षाच्या मुलीनं केलं लग्नासाठी प्रपोज सलमानच्या वडिलांची म्हणजेच प्रजापती पांडे यांची भूमिका विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना साकारणार आहेत. यासंबंधीची एक पोस्ट सई मांजरेकरने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

जाहिरात

महेश मांजरेकरही या सिनेमात छोट्या भूमिकेत दिसतील. महेश आणि सलमान पूर्वीपासूनचे मित्र आहेत. सई मांजरेकरला या सिनेमात भूमिका देण्याविषयी बोलताना निर्माता आणि अभिनेता अरबाज खान एका मुलाखतीत म्हणाला, “सलमानने सईला पाहिलं होतं. तो भेटलाही होता. दबंग 3 मधली ही भूमिका ती करू शकेल असा त्याचा अंदाज होता आणि सईनं चांगलं काम केलं आहे.” हे ही वाचा : तब्बल 11 वर्षांनी महेश मांजरेकर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना देणार ‘धक्का’ आपल्याबरोबरची ही तरुण अभिनेत्री कशी आहे याबद्दल in.com शी बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “मी स्वतः दबंगमधूनच पदार्पण केलं होतं. मी सईबरोबर एकच सीन केलाय. सईचा हा पहिला सिनेमा असेल. सई लहान आहे, तरुण आहे आणि मस्त आहे.” सलमान खानच्या दबंग सीरिजमधला हा तिसरा सिनेमा असून या सिनेमात बॉलिवूडसोबतच मराठी अभिनेता महेश मांजरेकर आणि त्यांची लहान मुलगी सई मांजरेकर यांनाही संधी देण्यात आली आहे. यावर मिड-डेशी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, ‘मी या सिनेमात हरियाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात मी पाहूण्याकलाकाराच्या भूमिकेत आहे. याशिवाय माझी मुलगी सुद्धा या सिनेमात दिसणार आहे. सई आणि सलमान यांच्यासोबत माझे काही सीन्स या सिनेमात आहेत. मुलीसोबत एकाच फ्रेमध्ये काम करायला मिळत आहे. त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.’ हे ही वाचा : बाबो ! ऑर्डर केलेल्या दोन केळ्यांचं एवढं बिल; हॉटेल जोमात अभिनेता कोमात सलमान हिंदीतला बिग बॉस करतो तसे महेश मांजरेकर सध्या बिग बॉस मराठी 2 मुळे चर्चेत आहेत. सध्या या सिनेमाचं शूटिंग महाराष्ट्रातील बारामतीमध्ये सुरू आहे. एप्रिल महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरू झालं असून यातील काही भागाचं शूटिंग मध्य प्रदेशच्या महेश्वरमध्ये झालं आहे. जुलै अखेर पर्यंत हे शूट पूर्ण होणार आहे. ‘दबंग 3’चं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार आणि दिग्दर्शक प्रभूदेवा करत आहे. या सिनेमामध्ये खलनायकाच्या भूमिकेत साऊथ सुपरस्टार सुदीप दिसणार आहे. या सिनेमात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, माही गिल, प्रमोद खन्ना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. ‘दबंग 3’ 20 डिसेंबर 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. —————————— सलमानचा प्रेमळ अंदाज, आईसोबत डान्सचा VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात