‘थ्री इडियट्स’च्या या पन्नाशीतल्या अभिनेत्याला 18 वर्षाच्या मुलीनं केलं लग्नासाठी प्रपोज

‘थ्री इडियट्स’च्या या पन्नाशीतल्या अभिनेत्याला 18 वर्षाच्या मुलीनं केलं लग्नासाठी प्रपोज

आपल्या चाहतीच्या या निरागस प्रश्नाला अभिनेत्यानं सुद्धा खूप क्यूट उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : थ्री इडियट्स या सिनेमातील अभिनेता आर माधवन बॉलिवूड सोबतच साउथ सिनेसृष्टीतही खूप लोकप्रिय आहे. त्याचं अभिनय कौशल्य आणि लुक्समुळे तो प्रसिद्ध आहे. पन्नाशीतला हा अभिनेता अभिनयाच्या बाबतीत सर्व नव्या कलाकरांना टक्कर देतो. त्यामुले सोशल मीडियावर त्यचा स्वतःचा वेगळा चाहतावर्ग आहे. त्यात करून त्याच्या चाहत्यांमध्ये तरुणींची संख्या जास्त आहे. अशातच माधवनसोबत एक गमतीशीर किस्सा घडला आहे. माधवनच्या एका सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत एका 18 वर्षीय तरुणीनं त्याला लग्नासाठी प्रपोज केलं.

तब्बल 11 वर्षांनी महेश मांजरेकर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना देणार ‘धक्का’

मादवननं काही दिवसांपूर्वी एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या फोटोला त्यानं, ‘एडिटिंग हे खूप मजेदार असतं तुम्ही घाबरता आणि त्याचा आनंदही घेता. मात्र शेवटी बराच मोठा प्रवास केल्यांनंतर तुम्ही म्हतारे होताच’ असं कॅप्शन दिलं होतं. त्यावर कमेंट करताना एका मुलीनं चक्क त्याला लग्नाची मागणी घातली आहे. तिनं लिहिलं, ‘काय चुकीचं आहे की मी 18 वर्षांची आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल.’

निकच्या VIRAL शर्टलेस फोटोची नेटीझन्सनी उडवली खिल्ली, म्हणाले...

आपल्या चाहतीच्या या निरागस प्रश्नाला माधवननं सुद्धा क्यूट उत्तर दिलं. त्यानं लिहिलं, ‘हाहाहा... देव तुझं भलं करो... पण तुला नक्की माझ्याहून चांगली व्यक्ती मिळेल.’ माधवननं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर अनेक सेलिब्रेटींनी त्याच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. या फोटोमध्ये माधवन सॉल्ट अँड पेपर लुकमध्ये दिसत आहे. शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रानं या फोटोवर, ‘तु फेअर अँड हँडसम वापर करतोस का?’ अशी कमेंट केली आहे.

बाबो ! ऑर्डर केलेल्या दोन केळ्यांचं एवढं बिल; हॉटेल जोमात अभिनेता कोमात

माधवनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा वैज्ञानिक ‘नंबी नारायणन’ याच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये माधवन वेगळ्याच अवतारात दिसणार आहे. हा सिनेमा हिंदी, तमिल, तेलुगू, मलयालम, इंग्लिश भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

=======================================================

VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी

First published: July 24, 2019, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading