मुंबई, 24 जुलै : सध्या बॉलिवूड प्रमाणं मराठी सिनेमांनीही प्रेक्षकांनी आपली वेगळी छाप सोडायला सुरुवात केली आह. सुरुवातीला फक्त मनोरंजनाच्या उद्देशान बनवले जाणारे हे सिनेमे आता सामाजिक विषयांवरही भाष्य करू लागले आहेत. मराठी चित्रपटांची सध्या देशातच नाही, तर जगभरात चर्चा आहे. मात्र मराठी चित्रपट स्थित्यंतराच्या काळातून जात असताना महेश मांजरेकर यांच्या ‘दे धक्का’ या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थानं धक्का दिला होता. कारण या चित्रपटानं 2008 मध्ये दहा कोटींचीकमाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा 11 वर्षांनी मराठी सिनेसृष्टीला दुसरा धक्का मिळणार आहे. कारण महेश मांजरेकर नव्या वर्षात ‘दे धक्का’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. निकच्या VIRAL शर्टलेस फोटोची नेटीझन्सनी उडवली खिल्ली, म्हणाले… ‘दे धक्का 2’ चं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. सिनेमाच्या पोस्टरवर वेलकम टू लंडन असं म्हटलं आहे. त्यामुळे सिनेमाचं महत्त्वाचं कनेक्शन लंडनशी असणार हे कळतं आहे. आता ते काय असेल, हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. मात्र, सिनेमाचं पोस्टर अत्यंत फ्रेश आणि रंजक आहे. त्यामुळे सिनेमाही नक्कीच धमाकेदर असेल यात शंका नाही. दे धक्का मधील मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव ही स्टारकास्टही ‘दे धक्का 2’ मध्ये दिसेल. मात्र बाकी कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. Manoj Kumar यांनी असं काय केलं ज्यामुळे त्यांचं नावच बदललं गेलं
अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि स्कायलिंक एंटरटेन्मेंट प्रस्तुत या सिनेमाचं यतीन जाधव आणि स्वाती खोपकर निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बट्टीन आणि तबरेट पटेल को प्रोड्यूसर, कर्मिका टंडन आणि विशिष्ठा दुसेजा असोसिएट प्रोड्यूसर आहेत. महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर ‘दे धक्का 2’ चं दिग्दर्शन करणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी 3 जानेवारीला रिलीज होणार आहे. झाला ना पोपट! मित्राला KISS करायला गेली प्रिया प्रकाश, आणि… ===================================================== VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी