मुंबई, 26 जून : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. एका पत्रकारानं सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर भर रस्त्यात मारहाण करणे, धमकी देणे आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली आहे. या पत्रकाराचं नाव अशोक पांडे असून ते त्यांचे वकील नीरज गुप्ता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलमान विरोधात अंधेरी मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनवणी 12 जूनला होणार आहे.
Mumbai: A criminal complaint has been filed against actor Salman Khan by one Ashok Pandey before Metropolitan Magistrate Court, Andheri, for robbery, assault, criminal mischief & criminal intimidation.
अशोक पांडे यांनी ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी डीएम नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र सलमानचं बॉलिवूडमधील स्थान आणि ताकद पाहता पोलिसांनी या प्रकणामध्ये सलमानवर कोणतीही करवाई केली नाही. त्यामुळे अशोक यांनी अंधेरीच्या लोअर कोर्टमध्ये सलमान विरोधात याचिका दाखल केली आहे. पत्रकार अशोक पांडे जेव्हा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे अशोक यांनी न्यायालयात जाण्याची निर्णय घेतला.
ही घटना 24 एप्रिल 2019ची आहे. यावेळी सलमान त्याच्या बॉडीगार्ड आणि काही लोकांसोबत सायकलिंगसाठी निघाला होता. त्याचवेळी अशोक त्यांच्या कॅमेरामनसोबत जूहूवरून कांदिवलीला जात होते. त्यांनी सलमानला पाहिलं आणि त्याचा व्हिडिओ बनवू लागले. पण जेव्हा सलमाननं त्यांना व्हिडिओ बनवताना पाहिलं तेव्हा त्यानं अशोक यांचा कॅमेरा काढून घेतला आणि त्यांना धमकी द्यायला सुरुवात केली.
अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारानंतर सलमाननं आपल्या बॉडीगार्डना इशारा केला. त्यानंतर सलमानच्या बॉडीगार्ड्सनी अशोक यांना मारहाण केली. अशोक यांचं म्हणणं आहे की, त्यांनी सलमानच्या बॉडीगार्डला विचारुनच हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. अशोक यांना मारहाण केल्यानंतर त्या लोकांनी अशोक यांचा फोन काढून घेतला आणि त्यातील डेटा डिलीट करण्याचाही प्रयत्न केला.