मुंबई, 03 जुलै : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर शुट करण्यासाठी आलेलं ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणं सगळ्यांना माहिती असेल. मुंबईच्या रस्त्यांवर भर पावसात शुट करण्यात आलेलं हे एव्हरग्रीन गाणं आजही तितक्याच आवडीनं ऐकलं जातं. पाऊस सुरू झाल्यानंतर आपसुकच हे गाणं प्रत्येकाच्या तोंडी येतंच. तब्बल 40 वर्षांनी रिमझिम गिरे सावन या गाण्याचं रिक्रिएशन करण्यात आलंय. ते कोणी तरूण कपलने नाही तर एक ज्येष्ठ दाम्प्यावर या गाण्याचं रिक्रिएशन करण्यात आलंय. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून खुद्द उद्योगपती आनंद महिद्रा यांना देखील या गाण्याचा मोह झाला. त्यांनी ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे. मोठ्या लेन्स, ठरावीक शेड्यूलमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर हे गाणं शुट करण्यात आलं असावं असं तुम्हाला वाटत असेल पण नाही, साध्या आयफोनवर सिनेमात शुट करण्यात आल्यासारखंच सेम गाणं शुट करण्यात आलं आहे. गाण्याचं रिक्रेशन करणारे सिनेसृष्टीतील निर्माते देखील नाही. केवळ आपल्या मित्राची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी या गाण्याचं रिक्रेशन करण्यात आलं. जाणून घेऊया या रिक्रेशन केलेल्या गाण्यामागची गंमत. हेही वाचा - शम्मी कपूरची चेष्टा करणं फिरोज खानला चांगलंच भोवलं; भर पार्टीत भिडले होते दोन सुपरस्टार्स रिमझिम गिरे सावन या गाण्याचं रिक्रिशन हे शैंलेंद्र इनामदार आणि त्यांची पत्नी वंदना इनामदार यांच्यावर करण्यात आलं. तर अनुप रिंगणगावकरआणि अंकिता रिंगणगावकर यांनी गाण्याचं चित्रण केलं. खोटं वाटू शकतं पण या गाण्याचं संपूर्ण चित्रण हे आयफोनवर करण्यात आलं आहे. गाण्याचं रिक्रिशन करण्याबद्दल अनुप रिंगणगावकर यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीत सांगितलं की, “प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही इच्छा असताता. माझ्या एका मित्राच्या बकेट लिस्टमध्ये या गाण्यावर काही तरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही हे गाणं करण्याचं ठरवलं”.
पहिल्याच दिवशी पाऊसानं हिरमोड केला अनुप रिंगणगावकर यांनी पुढे सांगितलं, “गाण्याचं शुट करण्यासाठी आम्ही हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिवस ठरवला आणि साऊथ मुंबईत शुटींगला गेलो आणि नेमका त्या दिवशी पाऊस पडलाच नाही. नरिमन पॉइंटला आम्हाला सुदैवानं गर्दी भेटली नाही त्यामुळे तिथे आम्ही हवे तसे आणि सिनेमातील गाण्यात दाखवल्या प्रमाणे सीन शुट केले”. हेही वाचा - जया बच्चन यांची एक धमकी अन रेखाची सिनेमातून हकालपट्टी; नंतर हेमासोबत सुपरहिट झाली अमिताभ यांची जोडी मुंबई अजिबात बदलली नाही मुंबईत शुटींग करतानाचा अनुभव सांगताना अनुप म्हणाले, “मुंबई अजिबात बदलली नाहीये. आम्हाला जुन्या गाण्यातील सीन्स जसेच्या तसे मिळाले. काही सीन्स याला अपवाद आहेत. गाण्यात अमिताभ आणि मौसमी चॅटर्जी यांच्या मागे राजाबाई टॉवर दिसतोय आणि ते डबक्यातून चालत असतात. आम्ही मैदानात गेले तेव्हा आम्हाला देखील राजबाई टॉवर आणि समोर एक सेम टू सेम पाण्याचं डबकं दिसलं. कोणताही वेळ न घालवता आम्ही शुट करून टाकलं”. आयफोनमधून शुटींग केलं रिमझिम गिरे सावन या गाण्याचं संपूर्ण रिक्रिएशन हे आयफोन 13 प्रो या फोनमधून करण्यात आलं आहे. अनुप रिंगणगावकर यांनी संपूर्ण शुटींग केलं. त्यांना शुटींगचं कोणतंही प्रशिक्षण नाहीये. चार जणांच्या मदतीने गाणं शुट करण्यात आलंय असं त्यांनी सांगितलं. ते मुळचे नागपूरचे असून पुण्यात वैद्यकिय क्षेत्रात काम करतात. गाण्यात अमिताभ बच्चन झालेले शैलेंद्र इनामदार हे डायड्रॉलिक्स क्षेत्रात काम करतात.