मुंबई, 1 जुलै- बॉलिवूड जगतात जेव्हा कधी लव्ह ट्रॅंगलची चर्चा होते, तेव्हा अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या नावांची चर्चा ही होतीच. एक काळ असा होता की, अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे सिनेमा बॉक्स ऑफीसवर धमाका करत होते. या जोडींने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण या जोडीच्या आयुष्य एक असा काळ देखील आला होता की, निर्मात्यांनीच रेखा आणि अमिताभ यांना एकत्र सिनेमात घेण्यास नकार दिला होता. 1982 रिलीज झालेल्या सुपरहिट ‘सत्ते पे सत्ता’ या सिनेमात या जोडीला आधी घेतलं जाणारं होतं पण एका धमकीमुळं निर्मात्यांना हा निर्णय बदलावा लागला होता. हा किस्सा नेमका काय आहे, याबद्दलच आपण जाणून घेणार आहे. 1981 मध्ये दिग्दर्शक यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक राज एन सिप्पी यांना अमिताभ-रेखा यांच्यासोबत सत्ते पे सत्ता नावाचा सिनेमा करायचा होता. शेवटी हा सिनेमा अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यासोबत करण्यात आला आणि प्रदर्शित झाला. या दोघांशिवाय या चित्रपटात अमजद खान, सचिन, शक्ती कपूर, रणजीता कौर, सारिका, प्रेमा नारायण, कंवलजीत सिंग यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.
IMDB.com च्या रिपोर्टनुसार, या सिनेमाच्या दिग्दर्शकाला रेखा-अमिताभच्या जोडीला घेऊन हा सिनेमा बनवायचा होता. मात्र, अमिताभ यांनी समोर येऊन हा सिनेमा करण्यास नकार दिला. त्याला कारणही तसं होतं. अमिताभ यांचं नाव त्यावेळी रेखा यांच्यासोबत जोडलं होतं. त्यांच्या रेखासोबतच्या कथित प्रेमसंबंधाच्या बातम्यांमुळे त्यांचे संसार मोडणार होता. अशा परिस्थितीत रेखासोबत काम करून या अफवांना त्यांना आणखी हवा द्यायची नव्हती. यासोबतच असं म्हणतात की, जया यांनी देखील रेखासोबत काम न करण्याबद्दल अमिताभ यांना सक्त धमकी वजा सूचना दिली होती. त्यामुळे अमिताभ यांनी स्वतः पुढे येऊन रेखाला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला.
रिपोर्ट्नुसार, रेखा यांना या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर दिग्दर्शक परवीन बाबीसोबत हा सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा प्लॅन देखील फसला. शेवटी हा सिनेमा हेमा मालिनी यांच्या पदरात पडला. 1982 मध्ये अमिताभ-हेमा यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून सुपरहिट ठरला होता. रेखा-परवीनला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर अमिताभ यांची हेमा मालिनी यांच्यासोबतच्या जोडी या सिनेमात सुपरहिट ठरली. त्यामुळे या सुपरहिट सिनेमामुळे अमिताभा पुन्हा एकदा सुपरहिट झाले.