मुंबई, 15 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वांनी स्वतःला घरातच कैद करुन घेतलं आहे. बॉलिवूड कलाकार सुद्धा सिनेमांच्या शूटिंग थांबवून घरी राहिले आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात शिल्पा तिच्या कुटुंबीयांसोबत आहे. खासकरुन ती सध्या तिच्या मुलीसोबत वेळ घावताना दिसत आहे. अशात शिल्पानं मुलगी समिशा सोबतचा एक व्हिडीओ शेअर करत तिचं आणि 15 या अंकाशी असलेल्या खास कनेक्शनचा खुलासा केला आहे.
आज 15 एप्रिलला शिल्पा शेट्टीची मुलगी समिशा 2 महिन्यांची झाली. त्यानिमित्तानं शिल्पानं तिच्या इन्स्टाग्रामावर एक लेकीसोबत खेळतानाचा एक व्हिडीओ शेअर करत 15 या अंकाशी एक खास कनेक्शन असल्याचा खुलासा केला. शिल्पा शेट्टी फेब्रुवारी महिन्यात सरोगसीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा आई झाली. याची माहिती तिनं सोशल मीडियावरुन दिली होती. शिल्पा लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र मुलीला वेळ देण्यासाठी तिनं तिच्या सिनेमांचं शूटिंग फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पूर्ण केलं होतं.
'उद्धवा... बाळासाहेबांच्या बछड्या.. तू लढ', मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर शिल्पा शेट्टी खूप खूश आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिनं सांगितलं आहे की काही गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप स्पेशल असतात. जसं की 15 हा अंक तिच्यासाठी मागच्या काही दिवसांपासून खूपच लकी ठरत आला आहे. 15 फेब्रुवारीला समिशाचा जन्म झाला. आज 15 एप्रिलला ती 2 महिन्यांची झाली आहे आणि याच दिवशी टिक टॉकवर शिल्पा शेट्टीचे 15 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.
ना स्टारडम, ना स्टाइल, पहिल्या फोटोशूटच्या वेळी असे दिसायचे अमिताभ बच्चन
हा व्हिडीओ शेअर करताना शिल्पानं लिहिलं, सर्वांनी भरभरून दिलेल्या या प्रेम आणि आशीर्वादांसाठी सर्वांचे खूप खूप आभार. आशा करते की, तुम्ही सर्वजण पुढे सुद्धा आमच्यासोबत असेच जोडलेले राहाल. या व्हिडीओमध्ये शिल्पा आणि तिची मुलगी पिंक कलरच्या आउटफिट्समध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर शिल्पाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
(संपादन : मेघा जेठे.)
शाहिद-सैफसोबत लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील? करिनानं दिलं धम्माल उत्तर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Shilpa shetty