मुंबई, 17 जुलै- ‘पाहिले नं मी तुला’(Pahile Na Mi Tula) मालिकेत लवकरच मानसी(Manasi) आणि अनिकेतच्या(Aniket) आयुष्यात एक खास गोष्ट घडणार आहे. या दोघांनाही मानसीच्या बाबांचा आशीर्वाद मिळणार आहे. मनू आणि अनिने गुपचूप लग्न केल्यामुळे मनूचे बाबा तिच्यावर खुपचं नाराज झाले होते. आणि त्यातच त्यांनी तिला घराबाहेरसुद्धा काढलं होतं. मात्र आत्ता पुन्हा एकदा सगळं सुरळीत होणार असल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
झी मराठीवर प्रसारित होणारी ‘पाहिले नं मी तुला’ मालिका खुपचं लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील मनू आणि अनिकेतची लव्हस्टोरी आणि या दोघांच्या संसारात समरची होणारी ढवळाढवळ चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. मालिकेत मनू आणि अनिकेतच्या आयुष्यात समर सतत नवनवीन संकट उभी करत असतो. तसेच या दोघांना न कळत त्यांच्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र या दोघांच्या प्रेमापुढे समरच्या सर्व कारस्थांचा इस्कुट होतो. समर मनू आणि अनिकेतचं लग्न मोडण्यासाठी हव ते करायला तयार असतो. मात्र मनूसुद्धा प्रत्येक अडचणीत खंबीरपणे अनिकेतची साथ देते. आणि या अडचणीतून मार्ग काढत असते.
(हे वाचा: परश्याचं डार्लिंगसोबत PHOTOSHOOT, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात )
नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून लवकरच मालिकेत आनंदाचे क्षण पाहायला मिळणार असल्याचं समजत. कारण यामध्ये मानसी आणि अनिकेत मानसीच्या माहेरच्या घरी गेलेले आहेत. या दोघांना आईबाबांनी जेवायला बोलावलं आहे. याचं वेळी मानसीचे बाबा तिला आणि अनिकेतला मायेने मिठीसुद्धा मारतात. त्यामुळे या दोघांनाही बाबांची माफी मिळाल्याचं दिसत आहे. मानसी आणि अनिकेतने गुपचूप लग्न केल्यामुळे तिचे बाबा तिच्यावर नाराज होते. मात्र आत्ता मालिकेत बाबांचा राग नाहीसा होताना दिसणार आहे. तसेच प्रोमोमध्ये मानसी आणि अनिकेत खुपचं सुंदर उखाणासुद्धा घेताना दिसत आहे. आता मालिकेत येणारे हे गोड क्षण बघण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.