मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Video : नव्या मालिकेत भार्गवी चिरमुले दिसणार आईच्या भूमिकेत

Video : नव्या मालिकेत भार्गवी चिरमुले दिसणार आईच्या भूमिकेत

 कर्लस मराठीवर (Colors Marathi )आई मायेचं कवच (Aai Mayecha Kavach) ही नवीन मालिका 27 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  मुंबई, 4 डिसेंबर- कर्लस मराठीवर (Colors Marathi )आई मायेचं कवच (Aai Mayecha Kavach) ही नवीन मालिका 27 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले  मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आई मायेचं कवच मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येते की, ही कथा आई व मुलीच्या नात्यावर आधारित आहे. आईच्या भूमिकेत भार्गवी दिसत आहे. मालिकेच्या प्रोमोच भार्गवी आई म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. तर तिघडे मुलगी त्याचा गैरफायदा घेऊन कॉलेजमधील तास बंक करून पार्टी करताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार व मालिका कशी असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. वाचा :PHOTO : पूजा सावंतचा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार, नवं फोटोशूट चर्चेत!  अभिनेत्री भार्गवी चिरमुले(Bhargavi Chiramule) हिने तिच्या अभिनय कौशल्याने आजवर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.'वहिनीसाहेब', 'अनुबंध', 'असंभव', 'पिंजरा', ‘मेरे साई’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक मालिकांमध्ये काम करत अभिनेत्री स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाचा : Good Vibes 2021 : यंदा या चार मराठी मालिका Googleवर केल्या गेल्या सर्वात जास्त सर्च ! कर्लस मराठीने या मालिकेचा प्रोमो शेअर करत म्हटलं आहे की, तुम्ही तुमच्या मुलांना किती ओळखता ?आजच्या धकाधकीच्या आयुष्यात हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडलेला दिसतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधता, शोधता उलगडलं जाणार आई-मुलीचं नातं; पाहूया नवी गोष्ट '#Aai मायेचं कवच'; 27 डिसेंबरपासून रात्री 10 वा. फक्त आपल्या #ColorsMarathi वर.
  मालिकाच नाही तर भार्गवीने आतापर्यंत 'संदूक', 'आयडियाची कल्पना', 'धागेदोरे', 'अनवट' अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये नाव गाजवणारी भार्गवी नृत्यात देखील पारंगत आहे. भार्गवीने भरतनाट्यमचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Colors marathi, Entertainment, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या