मुंबई, 4 डिसेंबर- छोट्या पडद्यावरील काही लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात पक्क स्थान निर्माण केले आहे. आता लवकरत (2021 Good Vibes 2021 ) संपून आपण 2022 मध्ये नव्या वर्षात पदार्पण करणार आहे. मात्र नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी व या वर्षाला निरोप देण्यापूर्वी 2021 मध्ये गुगलवर (Google Search ) कोणत्या मराठी मालिका सर्च करण्यात आल्या याबबद्दल जाणून घेणार आहे. एखा पोर्टलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
मराठी सीरीयल या इन्स्टा पेजने वर्षाचा रिपोर्ट सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी यंदाच्या वर्षात सर्वात जास्त गुगलवर कोणत्या मराठी मालिका सर्च करण्याल आल्या याविषयी माहिती दिली आहे. यामध्ये कर्लस मराठीवर बिग बॉस मराठी ३ तसेच स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte ) व झी मराठीवरील देवमाणूस (Devmanus ) यासोबतच स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta ) ही मालिका सर्वात जास्त गुगलवर सर्च करण्यात आली आहे.
वाचा :#BanLipstick अभिनेत्रींचा प्रमोशन फंडा की आणि काय...,लिपस्टिक पुसण्याचे कारण काय?
यापैकी देवमाणूस दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात सर्चिंगमधल्या असलेल्या मालिका येणाऱ्या नव्या वर्षात देखील प्रेक्षकांवर आपली जादू कायम ठेवण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
View this post on Instagram
आई कुठे काय करते ही मालिका नेहमीच ट्वीस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. यासोबतच देवमाणूस ही मालिका त्यातील कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनावर आधिराज गाजवत आहे. बिग बॉस मराठीचं सांगायचे तीर इतर सीजनप्रमाणे हा सीजन देखील चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सुख म्हणजे नक्की काय असत या मलिकेतील जयदीप आणि गौरीची जोडी सगळ्यांची आवडती जोडी आहे. या मालिकेने देखील कमी काळात प्रेक्षकांच्या मनात चांगल स्थान निर्माण केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.