मुंबई, 03 डिसेंबर : टेलिव्हिजनवरील काही शो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातील एक शो म्हणजे CID. जवळपास 21 वर्ष टेलिव्हिजन गाजवणारा हा शो 2018मध्ये अचानक बंद झाला. इंडियन टेलिव्हिजनच्या इतिहासात इतके वर्ष सुरू असलेला हा पहिलाच शो आहे. प्रेक्षकांनीही या शोला अनेक वर्ष प्रचंड प्रतिसाद दिला. CID मधील प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. यातील प्रत्येक पात्र प्रसिद्ध झालं. पण विशेष प्रसिद्धी मिळाली ती दया या व्यक्तिरेखेला. हा दया त्याच्या फिटनेसमुळे खूपच लोकप्रिय आहे. एका दणक्यात तो दरवाजा तोडतो. पण नुकतंच दया यांची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
'सीआयडी'मध्ये इन्स्पेक्टर दया यांची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीचे काही दिवसांपूर्वी हेअर ट्रान्सप्लांट करण्यात आले. त्याच्या केसांची वाढही सुरू झाली आहे. पण त्यांचा केस प्रत्यारोपणाचा अनुभव भयानक ठरला. दयानंद शेट्टी यांनी नुकतेच त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे सांगितले आहे.
हेही वाचा - लग्नाच्या 18 वर्षानंतर मिळालं आई-बाबा होण्याचं सुख; प्रसिद्ध अभिनेत्याने दाखवला लेकीचा चेहरा
दयानंद शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ''सुरुवातीला बरेच लोक तुम्हाला घाबरवतात की खूप त्रास होतो. सूज येते. पण मला आधी सूज आली नाही. केस प्रत्यारोपणानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी माझ्या पापण्यांजवळ थोडी सूज आली. त्याशिवाय चेहऱ्यावर सूज नव्हती. केस प्रत्यारोपणाला २० दिवस झाले आहेत. सुरवातीला होणारा त्रास आता बराच कमी झाला आहे. पण ज्या भागात केसांचे प्रत्यारोपण झाले आहे, तिथे अजूनही थोडा बधीरपणा आहे. दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत म्हणून मी पेन किलर घेणे बंद केले आहे.''दयानंद शेट्टी पुढे म्हणाले, 'कधीकधी मधेच डोके दुखते कारण सुन्नपणा येतो. चुकून कुठेतरी काहीतरी आदळलं तर कधी कधी खूप त्रास होतो.
दयानंद शेट्टी यांनी त्यांच्या करिअरबद्दल बोलायचे तर अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे, पण त्यांना ओळख 'सीआयडी'मधील दया या व्यक्तिरेखेने मिळाली. 'जब दया का हाथ पडा है ना तो मुह के अंदर दांत से पियानो बजने लगता है' हा त्यांचा सिग्नेचर डायलॉग खूप गाजला. दयानंद शेट्टी यांनी बॉलिवूडमध्ये 'दिलजले', 'जॉनी गद्दार', 'रनवे' आणि 'सिंघम रिटर्न्स'मध्ये काम केले आहे. आता लवकरच तो 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात विकी कौशल सह कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Television show