मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लग्नाच्या 18 वर्षानंतर मिळालं आई-बाबा होण्याचं सुख; प्रसिद्ध अभिनेत्याने दाखवला लेकीचा चेहरा

लग्नाच्या 18 वर्षानंतर मिळालं आई-बाबा होण्याचं सुख; प्रसिद्ध अभिनेत्याने दाखवला लेकीचा चेहरा

अपूर्व अग्निहोत्री-शिल्पा सकलानी

अपूर्व अग्निहोत्री-शिल्पा सकलानी

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आणखी एक जोडपे आहे, जे लग्नाच्या 18 वर्षानंतर पालक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 03 डिसेंबर : मनोरंजन सृष्टीतील प्रत्येक कलाकाराच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते. मग ते कोणाचं लग्न असो व कोणाला मूल झालेलं असो. प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या आनंदात सहभागी होतात पण त्यांच्या  प्रत्येक बाबीवर चर्चाही तेवढीच होते. नुकतंच एप्रिल 2022 मध्ये, देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी लग्नाच्या 11 वर्षानंतर आई बाबा झाले. एवढाच नाही तर त्याच वर्षी त्यांनी दुसऱ्या मुलीलाही जन्म दिला. आता त्यांची चर्चा सुरु असताना टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आणखी एक जोडपे आहे, जे लग्नाच्या 18 वर्षानंतर पालक बनले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर ही  आनंदाची बातमी शेअर केली आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'जस्सी जैसी कोई नहीं' फेम अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा सकलानी हे कलाकार अखेर लग्नाच्या १८ वर्षानंतर आई बाबा झाले आहेत. या जोडप्याने एका मुलीला जन्म दिला असून त्याचा फोटो आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सकलानी यांचा लग्न २००४ साली झालं होतं. आता 18 वर्षांनंतर 2 डिसेंबरला या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे. हा आनंद त्यांनी चाहत्यांशी शेअर केला.

हेही वाचा - Hansika Motwani : सुफी नाईटमध्ये हंसिका-सोहेलची रॉयल एन्ट्री; राजेशाही थाटात पार पडणार विवाहसोहळा

विशेष म्हणजे याच दिवशी अपूर्वचा वाढदिवस देखील आहे. त्याला आपल्या वाढदिवशी सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे.याविषयी एक व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन लिहला आहे कि, “म्हणूनच माझा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास वाढदिवस बनला, कारण देवाने आम्हाला आतापर्यंतची सर्वात खास, अविश्वसनीय, आश्चर्यकारक, चमत्कारी भेट दिली आहे. मी आणि शिल्पा आनंदाने आमची लाडकी मुलगी ईशानी कानू अग्निहोत्रीची ओळख करून देऊ इच्छितो. कृपया तिला आशीर्वाद द्या.” अशा शब्दात त्याने कॅप्शन लिहला आहे.

अपूर्वने अनेक फोटोंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आणि शिल्पा आपल्या मुलीसोबत वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहेत. कधी तो तिला किस करतोय तर कधी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीतील मित्र या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

अभिनेता अपूर्व आज 50 वर्षांचा झाला आहे, तर शिल्पा 40 वर्षांची आहे. ते एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले होते आणि त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली होती. शिल्पाने एकदा सांगितले होते की, जेव्हा तिने या अभिनेत्याला परदेशात पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली होती. प्रदीर्घ काळ डेट केल्यानंतर 24 जून 2004 रोजी दोघांनी डेहराडूनमध्ये लग्न केले. रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 7 मध्येही तो दिसला होता. याशिवाय नच बलिए सीझन 1 मध्ये दिसला होता.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Tv actors, Tv celebrities