जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / CID रिटर्न? एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत दिसले एकाच फ्रेममध्ये; समोर आली मोठी अपडेट

CID रिटर्न? एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत दिसले एकाच फ्रेममध्ये; समोर आली मोठी अपडेट

सीआयडी

सीआयडी

दया तोड दे ये दिवार, हे दमदार शब्द आता प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. CID हा शो पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 नोव्हेंबर : टेलिव्हिजनवरील काही शो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातील एक शो म्हणजे CID. जवळपास 21 वर्ष टेलिव्हिजन गाजवणारा हा शो 2018मध्ये अचानक बंद झाला. इंडियन टेलिव्हिजनच्या इतिहासात इतके वर्ष सुरू असलेला हा पहिलाच शो आहे. प्रेक्षकांनीही या शोला अनेक वर्ष प्रचंड प्रतिसाद दिला. CID मधील प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. हा शो संपल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. शो पुन्हा सुरू करण्याचीही वारंवार मागणी केली जात आहे. अशातच शो पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सीआयडी हा शो पुन्हा सुरू होणार आहे याबाबत एसीपी प्रद्युमन म्हणजेच अभिनेते शिवाजी साटम यांनी शो पुन्हा सुरू होतोय असं सांगितलं होतं. सीआयडी प्रेक्षकांना नव्या फॉर्मेटमध्ये पाहायला मिळणार आहे, असं ते म्हणाले होते. मात्र शोच्या शुटींग संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान अभिनेते शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर CIDच्या सगळ्या टीमबरोबरचा फोटो शेअर केला आहे. ज्यात क्रिएटर बीपी सिंह दिसत आहेत. तसंच इस्पेक्टर दया आणि अभिजीतही दिसत आहेत. त्यांच्याबरोबर शिवाजी साटम यांनी फोटो क्लिक केलाय. ‘CIDची गँग बिग डॅडी बीपी यांच्याबरोबर’, असं कॅप्शन त्यांनी पोस्टला दिलं आहे. हेही वाचा - आलिया भटला तिच्या मुलीसाठी कोणतं नाव सुचवाल? वाचा रॉयल नावांची यादी

जाहिरात

या पोस्टमधून शिवाजी साटम यांनी ते टेलिव्हिजनवर परत येत आहेत, अशी हिंट दिली आहे. CID नवीन फॉर्मेटसह नवीन कथांसहित प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सगळेच कलाकार नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बीपी सिंह शोसाठी मेहनत घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. शिवाजी साटम यांच्या पोस्टवरून आता CID कधीपासून सुरू होणार? कोणत्या वेळेत पाहायला मिळणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

2020मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये CIDच्या मेकर्सनी शो री टेलिकास्ट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही शो पुन्हा सुरू होणार आहे अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या.  काही मीडिया रिपोर्टनुसार, CIDच्या नव्या सीझनमध्ये जुनीच स्टारकास्ट दिसणार आहे. इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स, दया, अभिजीत आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. साळुंके पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात