मुंबई 3 जुलै : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान (Saroj Khan) यांनी मागील वर्षी जगाचा निरोप घेतला. 3 जुलैला त्यांची पहिली पुण्यतिथी (Death Anniversary) आहे. यानिमित्त त्यांचा संघर्षमय प्रवास पडद्यावर रेखाटण्याचा निर्णय घेतला आहे. टी सीरिजचे (T series) सर्वेसर्वा भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी या मोठ्या चरित्रपटाची घोषणा सरोज यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनी केली आहे. (Choreographer Saroj Khan Biopic) सरोज यांनी आजवर 2000 हून अधिक गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन केलं होत. कठोर मेहनतीनंतर त्यांना बॉलिवूड मध्ये अभूतपूर्व यश मिळालं होतं. सरोज यांनी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), श्रीदेवी (Shridevi) या आघाडीच्या अभिनेत्रीनाहीं नृत्य शिकवलं होतं. सरोज खान यांच्या कोरियोग्रफिवर अनेक सुपरहिट गाणी माधुरी, श्रीदेवी यांनी दिली होती.
चेंबूरचं घर विकणार रणधीर कपूर; नव्या घराच्या गृहप्रवेशासाठी नीतूसह पोहोचल्या कपूर सिस्टर्सचित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. भूषण कुमार म्हणजेच टी सीरिज या बायोपीकची निर्मिती करणार आहे.
IT'S OFFICIAL.. BHUSHAN KUMAR ANNOUNCES SAROJ KHAN BIOPIC... #BhushanKumar [#TSeries] announces biopic on legendary choreographer #SarojKhan... Further developments will be announced soon. pic.twitter.com/y4rLFepfvK
— taran adarsh (@taran_adarsh) July 3, 2021
50च्या दशकात सरोज यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षीच सरोज यांनी लग्नगाठ बांधली होती. 43 वर्षांच्या के. बी. सोहनलाल यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. पण हा संसार फार काळ टिकू शकला नाही. दरम्यान सरोज यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. तर लग्नानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसारत्यांनी फार संघर्ष करत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. पण त्यांचं वयक्तिक जीवनही तितकाच खडतर राहिलं होतं. हाच त्यांचा जीवप्रवास आता पडद्यावर दिसणार आहे.