बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी नुकताच घटस्फोट जाहीर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पण या जोडीच्या वयातील अंतर माहीत आहे का? पाहा कसा होता या जोडीचा प्रवास.
किरण राव आणि आमिर खान यांनी २००५ साली एकमेकांशी विवाह केला होता. पण आता १५ वर्षानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्ण घेतला आहे.
आझाद राव खान या मुलाला त्यांनी २०११ साली सरोगेसीच्या माध्यामातून जन्म दिला होता. आमिरला याआधीही २ दोन मुलं आहेत.
आमिरने आधी रिना दत्ता हिच्याशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी ही आहे. २००२ साली ते विभक्त झाले.