जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुपरहिट Pawankhind आता घरबसल्या पाहता येणार, सिनेमा आजपासून या OTT प्लॅटफॉर्मवर

सुपरहिट Pawankhind आता घरबसल्या पाहता येणार, सिनेमा आजपासून या OTT प्लॅटफॉर्मवर

सुपरहिट Pawankhind आता घरबसल्या पाहता येणार, सिनेमा आजपासून या OTT प्लॅटफॉर्मवर

‘पावनखिंड’ या सुपरहिट मराठी सिनेमाची विशेष चर्चा झाली. अद्यापही थिएटरमध्ये हा सिनेमा दाखवला जात आहे. दरम्यान असे असले तरी ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 मार्च: ‘पावनखिंड’ (Pawankhind Marathi Movie) या सुपरहिट मराठी सिनेमाची विशेष चर्चा झाली. अद्यापही थिएटरमध्ये हा सिनेमा दाखवला जात आहे. ‘द कश्मीर फाइल्स’, ‘बच्चन पांडे’, ‘गंगुबाई काठियावाडी’ तसंच ‘राधेश्याम’ या हिंदी सिनेमांना टक्कर देत आजही अनेक स्क्रीन्सवर हा सिनेमा दाखवला जात आहे. मराठी तसेच अमराठी बांधवांनी या सिनेमाला उचलून धरले, थिएटरमध्ये जाऊनच अनेकांनी हा सिनेमा पाहण्याचा आग्रह केला. दरम्यान असे असले तरी ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील अनेक शौर्यगाथा आपण वाचतो. अशीच एक शौर्यगाथा म्हणजे ‘पावनखिंड’ चा थरार. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी, आपल्या राजांसाठी प्राणांची आहुती दिली अन् ही घोडखिंड पावन झाली. बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेल्या या घोडखिंडीला त्यामुळे पावनखिंड असं नाव पडलं. हीच शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहताना सार्थ अभिमान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत. चित्रपट समीक्षकांनी देखील या सिनेमाचं कौतुक केलं. हे वाचा- VIDEO: ‘छत्रपती’ शिवाजी महाराज म्हणणं ‘Optional’ नाही, चिन्मय मांडलेकरच्या या कृतीमुळे होतंय कौतुक या सिनेमाच्या निमित्ताने हा ‘पावनखिंड’चा थरार प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाला. 18  फेब्रुवारीला रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने कमालीचा प्रेक्षकवर्ग कमावला. पण ज्यांनी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला नाही त्यांना आता हा सिनेमा ओटीटीवर (Pawankhind on OTT) अर्थात ऑनलाइन पाहता येणार आहे. आजपासून एका प्रख्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा स्ट्रीम होत आहे. ऑनलाइन कुठे पाहता येईल ‘पावनखिंड’? पावनखिंड या सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची शोर्यगाथा सांगणारे 8 चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातील पावनखिंड हा तिसरा सिनेमा. याआधी ‘श्री शिवराज अष्टक’ या सीरिजमधील फर्जंद आणि फत्तेशिकस्त हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दरम्यान पावनखिंड हा सिनेमा आजपासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Pawankhind on Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्वर पाहता येणार आहे.

जाहिरात

कोरोनाचे संकट पाहता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार होता. पण निर्बंध शिथिल झाल्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि किमया घडली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केले. ‘पावनखिंड’ या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम रचत सर्व चित्रपटगृहांच्या बाहेर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ चा बोर्ड लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. या धमाकेदार कामगिरीनंतर आता पावनखिंड अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे. हे वाचा- The Kashmir Files मुळे इतिहासाची पुनरावृत्ती! ‘जय संतोषी माँ’ची झाली आठवण सिनेमात आहे तगडी स्टारकास्ट या सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, सुरभी भावे, माधवी निमकर, दिप्ती केतकर, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे,  शिवराज वायचळ, राजन भिसे, सुश्रुत मंकणी, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, सुनील जाधव, स्तवन शिंदे अशी तगडी स्टारकास्ट आहे. शिवाय संतोष जुवेकर यामध्ये पाहुणा कलाकार म्हणून एका गाण्यात पाहायला मिळत आहे. पावनखिंड सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात