जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / The Kashmir Files मुळे Box Office वर इतिहासाची पुनरावृत्ती! 'जय संतोषी माँ'ची झाली आठवण

The Kashmir Files मुळे Box Office वर इतिहासाची पुनरावृत्ती! 'जय संतोषी माँ'ची झाली आठवण

The Kashmir Files मुळे Box Office वर इतिहासाची पुनरावृत्ती! 'जय संतोषी माँ'ची झाली आठवण

The Kashmir Files ने त्यांच्या 8 दिवसांच्या कमाईचा रेकॉर्ड तोडत शनिवार (The Kashmir Files Box Office collection day 9) सर्वात जास्त कमाई केली आहे, यामुळे बड्या फिल्म मेकर्सना नक्कीच घाम फुटला असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 मार्च: ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा थिएटरमध्ये पाहाण्यासाठी गर्दी काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यातही तितक्याच उत्सुकतने पाहाण्यासाठी चाहते सिनेमागृहात जात आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमावलेला गल्लाही 100 कोटींच्या पलीकडे पोहोचला आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे कमी बजेट असूनही या सिनेमाने 100 Crore Club मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड सेट करत आहे. या फिल्मने त्यांच्या 8 दिवसांच्या कमाईचा रेकॉर्ड तोडत शनिवार (The Kashmir Files Box Office collection day 9) सर्वात जास्त कमाई केली आहे, यामुळे बड्या फिल्म मेकर्सना नक्कीच घाम फुटला असेल. ‘द कश्मीर फाइल्स’हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यातही धमाकेदार कमाई करत आहे. आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ (Alia Bhatt Gangubai Kathiawadi) आणि प्रभासच्या ‘राधे श्याम’ला (Prabhas Radhe Shyam) जबरदस्त टक्कर दिल्यानंतर आता हा सिनेमा अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’वर (Akshay Kumar Bachchan Paandey) मात करत आहे. हे वाचा- ‘The Kashmir Files’सोबत मंजुळेंच्या चित्रपटाची ‘झुंड’,निर्मात्याने खडा केला सवाल आज कमाईचे सर्व रेकॉर्ड तुटणार तरण आदर्शच्या लेटेस्ट ट्वीटनुसार, ‘द कश्मीर फाइल्स’ने गेल्या 8 दिवसांपेक्षा 9व्या दिवशी सर्वाधिक (शनिवारी 19 मार्च) कमाई केली आहे.  दुसऱ्या आठवड्यात ज्याप्रमाणे बाहुबली 2 ट्रेंड झाला होता तसाच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या चित्रपटाने 9व्या दिवशी म्हणजेच शनिवारी 24.80 कोटींची कमाई केली आहे.

जाहिरात

आज म्हणजेच 10व्या दिवशी हा चित्रपट 28-30 कोटींची कमाई करेल, असा अंदाज तरण आदर्श त्यांनी व्यक्त केली आहे. चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 141.25 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी असा देखील अंदाज व्यक्त केला आहे की हा सिनेमा सोमवारी 175 कोटींचा आकडा गाठू शकतो. तसं झाल्यास एका लो बजेट सिनेमासाठी हा मोठा विजय ठरेल.

जाहिरात

47 वर्षांनी होत आहे इतिहासाची पुनरावृत्ती 1975 साली ‘जय संतोषी माँ’ (Jai Santoshi Maa Box Office Record) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. हाच इतिहास पुन्हा एकदा घडताना ‘द कश्मीर फाइल्स’ च्या निमित्ताने पाहायला मिळते आहे. तरण आदर्श यांनी केलेल्या ट्वीटनुसार 47 वर्षानंतर हे दुसऱ्यांदा होत आहे, जेव्हा एखादा लो बजेट सिनेमा एवढी जबरदस्त कमाई करुन बॉक्स ऑफिसवर नवा बेंचमार्क  सेट करत आहे. 47 वर्षांपूर्वी जय संतोषी माँ या सिनेमाने फिल्म ‘शोले’ (Sholay) ला टक्कर देत इतिहास घडवला होता. ‘जय संतोषी माँ’ने सिनेमाने त्यांच्या बजेटच्या वीसपट अधिक कमाई केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात