'छपाक'च्या शूटिंगनंतर दीपिकानं जाळला प्रोस्थेटिक्स लुक, कारण वाचून व्हाल हैराण

'छपाक'च्या शूटिंगनंतर दीपिकानं जाळला प्रोस्थेटिक्स लुक, कारण वाचून व्हाल हैराण

'छपाक' सिनेमात अ‍ॅसिड हल्ला पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकानं प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच मेघना गुलजारच्या 'छपाक' सिनेमात दिसणार आहे. मागच्या काही काळापासून दीपिका मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. संजय लीला भन्साळी यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा पद्मावत नंतर दीपिका लग्नाच्या तयारीला लागली होती. लग्नानंतर रिलीज होणारा छपाक हा दीपिकाचा पहिला सिनेमा आहे.

छपाक सिनेमासाठी दीपिकानं प्रचंड मेहनत घेतली आहे. हा सिनेमा दिल्लीची अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे.  हा एक बायोपिक सिनेमा असून दीपिका पहिल्यांदाच अशाप्रकारच्या भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं बरंच शूटिंग दिल्लीमध्ये झालं असून या दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. इतकंच नाही तर दीपिकाचा फर्स्ट लुक रिलीज झाल्यानंतरही सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. या सिनेमात दीपिकाच्या व्यक्तिरेखेचं नाव मालती आहे.

#MeToo संबंधित प्रश्नावर तापसी पन्नूचा चढला पारा, महिला पत्रकाराचा केला अपमान

 

View this post on Instagram

 

& it’s a wrap on THE MOST PRECIOUS film of my career...see you all at the movies!🎬 10.1.2020 #Chhapaak

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकानं जाळले प्रोस्थेटिक्स

या सिनेमात अ‍ॅसिड हल्ला पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकानं प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती. या लुकसाठी दीपिकाला तासंतास मेकअप करावा लागत असे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं छपाकच्या शूटिंग संपल्यावर शेवटच्या दिवशी तिनं हे प्रोस्थेटिक्स लुक जाळून टाकल्याचा खुलासा केला. दीपिका म्हणाली. मी या प्रोस्थेटिक्सचा एक तुकडा घेतला. अल्कोहोल घेतलं आणि एका कोपऱ्यात नेऊन तो प्रोस्थेटिक्स जाळून टाकला.

शूटिंग दरम्यान रेखा यांना 5 मिनिटं KISS करत होता अभिनेता, झाली अशी अवस्था

प्रत्येक कलाकारासाठी एखाद्या व्यक्तिरेखेशी जोडलं जाणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येकाची यातून बाहेर पडण्याची वेगळी पद्धत असते. कदाचित दीपिकाची ही पद्धत असू शकते. या सिनेमातील ही भूमिका साकारणं दीपिकासाठी खूपच कठीण गेलं होतं.

 

View this post on Instagram

 

& on to the next...Thank You @kabirkhankk for this incredible honour...! #RomiDev #Day1 @83thefilm @ranveersingh

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

'छपाक' सिनेमा येत्या 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'छपाक' व्यतिरिक्त दीपिका पदुकोण कबीर खानच्या '83' मध्ये दिसणार आहे. या सिनेमात  रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका रणवीरची ऑनस्क्रीन पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकरत आहे. पती रणवीर सिंहसोबत लग्नानंतर दीपिकाचा हा पहिला सिनेमा आहे.

दीपज्योतीनं 50 लाखांच्या प्रश्नावर सोडला KBC, 'मन की बात' ऐकून जिंकले 25 लाख

===================================================

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 04:06 PM IST

ताज्या बातम्या