शूटिंग दरम्यान रेखा यांना 5 मिनिटं KISS करत होता अभिनेता, झाली अशी अवस्था

शूटिंग दरम्यान रेखा यांना 5 मिनिटं KISS करत होता अभिनेता, झाली अशी अवस्था

मागच्या 6 दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या रेखा यांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या अभिनयाची जादू अद्याप प्रेक्षकांवर कायम आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : सुंदर... दिलकश... सदाबहार आणि रहस्यमय अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आज 65 वावाढदिवस साजरा करत आहेत. पण वयाच्या 65 वाय वर्षीही त्यांचं सौंदर्य लाजवाब आहे. त्या आजही तेवढ्याच सुंदर दिसतात. जेवढ्या त्या काही दशकांपूर्वी दिसत होत्या. मागच्या 6 दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या रेखा यांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या अभिनयाची जादू अद्याप प्रेक्षकांवर कायम आहे. पण फिल्मी करिअरसोबतच रेखा त्यांच्या खासगी जीवनामुळे प्रचंड चर्चेत राहिल्या. त्यांच्या वाढदवसानिमित्त जाणून घेऊयात रेखा यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी...

वडिलांचा करत होत्या तिरस्कार

रेखा यांचे वडील तमिळ इंडस्ट्रीचे सुपरस्टार होते. तर आई तमिळ सिनेमांची अभिनेत्री होती. असं म्हटलं जातं की रेखा यांचा जन्म झाला त्यावेळी तिच्या आई-वडीलांचं लग्न झालं नव्हतं. रेखाच्या वडिलांनी 4 लग्न केलं मात्र त्यांनी रेखा यांच्या आईशी कधीच लग्न केलं नाही. एवढंच नाही तर ते रेखाला आपली मुलगी सुद्धा मानत नसत. त्यामुळे असं म्हटलं जातं की रेखा त्यांच्या वडिलांचा एवढा तिरस्कार करत असत की त्या आपल्या वडिलांच्या अंतिम संस्काराला सुद्धा गेल्या नव्हत्या.

वयाच्या 65व्या वर्षी रेखा यांचं सौंदर्य कायम, काय आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट

नाइलाजानं वयाच्या 12 व्या वर्षी अभिन क्षेत्रात टाकलं पाऊल

अभिनेत्री म्हणून नावारुपास येण्याआधी रेखा यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा आल्या होत्या. रेखा यांच्या आईवर एवढं कर्ज होतं की, कमी वयातच रेखा यांच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षापासून तमिळ सिनेमात काम करायला सुरुवात केली. एवढ्या कमी वयात रेखा जेव्हा काम करुन थकून जात आणि कामाला जायला नकार देत त्यावेळी त्यांचा भाऊ त्यांना मारहाण करत असे. अनेकदा पैशाच्या चणचणीमुळे रेखा यांना सी ग्रेडच्या सिनेमांमध्येही काम करावं लागलं.

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणिती तयार, या दिवशी होणार शुटिंगला सुरुवात

लोकांच्या त्रासाला सामोरं जावं लागलं

अभिनेत्री म्हणून रेखा यांचा पहिला तेलुगू सिनेमा 1968मध्ये रिलीज झाला. तर 1970 त्यांना बॉलिवूडमध्ये 'सावन भादो' या सिनेमातून पहिला ब्रेक मिळाला. हा सिनेमा सुपरहीट झाला. मात्र त्यांना बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. यासीर उस्मान यांनी त्यांचं पुस्तक ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी.’मध्ये एका सिनेमाच्या शूटिंगचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं, 'अनजाना सफर' या सिनेमाचे दिग्दर्शक राजा नवाठे आणि अभिनेता बिस्वजीत यांनी रेखा यांना त्रास देण्यासाठी एक सीन शूट करायचं ठरवलं होतं ज्याबद्दल रेखा यांना कसलीच माहिती नव्हती.

काय होता सीन

15 वर्षांच्या रेखा रोमँटिक गाण्याच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचल्या. दिग्दर्शकानं अ‍ॅक्शन असं म्हटलं. बिस्वजीतनं रेखा यांना मिठीत घेतलं आणि त्यांचं चुंबन घेऊ लागला. या सीन बाबत रेखा यांना अजिबात माहिती नव्हती. बिस्वजीत 5 मिनिटं रेखा यांचं चुंबन घेत राहिला आणि युनिटचे लोक त्याला चिअरअप करत राहिले. पण या प्रकारानं रेखा यांना मात्र रडू कोसळलं.

पोलिसांचा मारही खाल्ला

रेखा अगदी सुरुवातीपासून मुमताज आणि जितेंद्र यांच्या चाहत्या होत्या. जितेंद्र यांचं शूटिंग पाहण्यासाठी त्यांनी पोलिसांचा मारही खाल्ला होता. 1973मध्ये रेखा आणि विनोद मेहरा यांच्या अफेअरच्या खूप चर्चां झाल्या. जवळापास 3 वर्षं हे दोघं नात्यात होते असं म्हटलं जातं. नंतर 1976मध्ये आलेल्या 'दो अनजाने' या सिनेमात रेखा आणि अमिताभ यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं.

रेखा यांच्या भांगातील सिंदूर आहे रहस्य

‘मुकद्दर का सिकंदर’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अमिताभ आणि रेखा यांच्यात जवळीक वाढली होती. तर ‘गंगा की सौगंध’ या सिनेमाच्या सेटवर अमिताभ यांनी रेखा यांनी त्रास देणाऱ्या व्यक्तीला मार दिला होता. 1982 मध्ये मध्ये नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांच्या लग्नात पहिल्यांदा रेखा यांच्या भांगात सिंदूर दिसला. तेव्हा पासून त्यांच्या भांगातील सिंदूर हे एक रहस्यच आहे.

KBC मध्ये विचारला मोदी सरकारशी संबंधित प्रश्न, तुम्हाला माहित आहे का याचं उत्तर?

सौंदर्याची खाण असलेल्या रेखा यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यामुळे त्या चर्चेतही राहिल्या. पण रेखा यांनी यावर कधी कोणतही स्पष्टीकरण दिलं नाही आणि त्याबद्दल बोलणाऱ्या व्यक्तींना त्याबद्दल कोणते पुरावे देता आले नाहीत. त्यामुळेच कदाचित रेखा यांच्या आयुष्यातील या रहस्यमयी गोष्टी त्यांना अधिकच सुंदर बनवत गेल्या.

================================================================

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

Published by: Megha Jethe
First published: October 10, 2019, 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading