VIDEO : भारतात कोरोनापासून वाचलेल्या पहिल्या व्यक्तीला कार्तिकने विचारले थेट प्रश्न, पाहा काय दिली उत्तरं

VIDEO : भारतात कोरोनापासून वाचलेल्या पहिल्या व्यक्तीला कार्तिकने विचारले थेट प्रश्न, पाहा काय दिली उत्तरं

एवढी काळजी घेऊनही कोरोना कसा झाला असा प्रश्न कार्तिकनं सुमितीला विचारला. यासह अनेक प्रश्नांना सुमितीने उत्तरं दिली.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. दरम्यान, भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने त्याच्या नव्या टॉक शोमध्ये देशातील अनेक प्रसिद्ध लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आहेत. त्याचा नुकताच पहिला भाग युट्यूबवर प्रसारीत झाला. यामध्ये त्याने देशातील पहिल्यांदा कोरोनापासून वाचलेली सुमिती सिंग हिची मुलाखत घेतली आहे.

कार्तिक आर्यनने सुमितीला कोरोनावरून अनेक प्रश्न विचारले आहेत. यात त्यानं विचारलं की, 'मुन्ना भाई चित्रपटात एक सीन आहे जिथं जिम्मी शेरगिलला जाणवतं की आपण ड्रिंकसुद्दा करत नाही, धुम्रपानसुद्धा नाही तरीही ते आजारी पडले. मी ऐकलं की तुम्ही ऑर्गेनिक टूथब्रश वापरता, सॅनिटाय़झरचाही वापर करत होता. चेहऱ्यावर मास्क लावून फिरत होता. तरीही कोरोना झाला. असा कोणाचा शाप लागला तुम्हाला?'

सुमितीने कार्तिकच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं की, 'मी फिनलँडला गेले होते त्यामुळे मला कोरोना झाला होता.' सुमितीने भारतात परत येताच स्वत:ला आयसोलेट करून घेतलं होतं. कार्तिक आर्यनच्या या नव्या टॉक शोचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिल्या कोरोना रुग्णासोबतचा हा व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणावर बघत आहेत.

हे वाचा : Coronavirus : इथं चाललंय काय आणि यांना चिंता वेगळीच, म्हणे किसिंग सीनचं कसं?

First published: April 12, 2020, 10:05 PM IST

ताज्या बातम्या