मुंबई 22 जुलै: देवमाणूस (Devmanus) ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतेय. एकामागून एक येणारे ट्विस्ट आणि सर्वच कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे देवमाणूस ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (Devmanus TV Serial) दरम्यान या मालिकेत आता आणखी एक नवं वळण आलं आहे. यामध्ये चंदी (Chandi) नामक एका तरुणीची एण्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे आल्याआल्याच तिने खलनायक देवी सिंगला आव्हान दिलं आहे. आता तिच्या मदतीने पोलीस देवी सिंगला बेड्या ठोकतील का?
झी वाहिनीने मालिकेचा एक प्रोमो रिलिज केला आहे. यामध्ये चंदा पोलिसांसोबत बोलताना दिसतेय. अर्थात ती नेमकं काय बोलतेय हे कळेलं नाही. परंतु देवी मात्र हे संभाषण पाहून प्रचंड घाबरला आहे. या पार्श्वभूमीवर चंदाच्या मदतीने पोलीस देवी सिंगला पकडतील का? अशी उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.
राज कुंद्राबाबत ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का
View this post on Instagram
शर्लिन चोप्रा करायची राज कुंद्रासाठी पॉर्नोग्राफी; का थांबवला बिझनेस?
‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन 13 वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटही असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळं ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv serial, Zee Marathi