मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राज कुंद्राबाबत ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का

राज कुंद्राबाबत ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का

तुरुंगातून बाहेर येताच गंदी बातमधील या अभिनेत्रीने घेतली राज कुंद्राच्या पॉर्न प्रकरणात उडी, केले मोठे खुलासे...

तुरुंगातून बाहेर येताच गंदी बातमधील या अभिनेत्रीने घेतली राज कुंद्राच्या पॉर्न प्रकरणात उडी, केले मोठे खुलासे...

तुरुंगातून बाहेर येताच गंदी बातमधील या अभिनेत्रीने घेतली राज कुंद्राच्या पॉर्न प्रकरणात उडी, केले मोठे खुलासे...

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 22 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. (Raj Kundra Pornography case) राजला अटक झाल्यापासून त्याच्याविरोधात अनेक अनेक नवोदीत मॉडेल्स आणि अभिनेत्री यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. काही अर्थिक फसवणूकीचे तर काहींनी चित्रपटांच्या नावाखाली फसवल्याचे. यातच आता गंदी बात फेम गहना वशिष्टची (Gehana Vasisth) देखील भर पडली आहे. राज आता एका नव्या वेबसाईटची तयारी करत असल्याचा दावा तिने केले आहे. या वेबसाईटवर त्याने कोट्यवधींची गुंतवणूकही केली आहे.

एकता कपूरच्या गंदी बात (Gandii Baat) या वेब सीरिजमधून प्रकाशझोतात आलेली गहना वशिष्ट एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या काही काळात ती अनेक बोल्ड सीरिजमध्ये झळकली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी तिला देखील पॉर्न प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. दरम्यान वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राजच्या अटकेवर तिने भाष्य केलं.

शर्लिन चोप्रा करायची राज कुंद्रासाठी पॉर्नोग्राफी; का थांबवला बिझनेस?

''मला फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन'', राजनं लीक केला होता माझा नंबर

या पॉर्न प्रकरणात तिने राजची बाजू घेतली. ती म्हणाली, “पॉर्न फिल्म आणि बोल्ड फिल्म यामध्ये खूप फरक आहे. लोक उगाचच कांगावा करत आहेत. राजवर केले जाणारे आरोप खोटे आहेत. राजने तयार केलेल्या चित्रपटांपेक्षा अधिक बोल्ड सीन गंदी बातमध्ये पाहायला मिळतात. मी यापूर्वी राजसोबत केलंय. परंतु त्याने कधीही माझ्यावर जबरदस्ती केली नाही. शिवाय अधिकृतरित्या करार करूनच प्रोजेक्ट केले. अन् ठरलेली रक्कम मला वेळेत दिली. सध्या तो आणखी एका वेब साईटवर काम करतोय. त्याने यावर कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. त्याच्या स्पर्धकांनीच ही केस केली असल्याची मला शंका येतेय.”

First published:

Tags: Crime, Entertainment, Raj kundra, Shilpa shetty