मुंबई, 1 सप्टेंबर: एके काळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री सायरा बानू (actress Saira Banu admitted to hopital) यांची तब्येत खालावल्याने मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी (Dilip Kumar wife) म्हणून सायरा बानू (Saira Banu) यांनी त्यांना अखेरपर्यंत खंबीरपणे साथ दिली. नुकतंच दिलीप कुमार यांचं निधन झालं आणि आता सायरा बानू यांचीही प्रकृती बिघडली आहे.
मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये सायरा बानू दाखल आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर दोन महिन्यांतच सायरा यांची तब्येत बिघडली. त्यांना गेल्या तीन दिवसांपासून ब्लड प्रेशरचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
‘सायरा बानो यांचं ते वाक्य ऐकून जीवच गेला असता’; धर्मेंद्र यांनी सांगितला अनुभव
रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची तब्येत स्टेबल आहे. पण रक्तदाब अजून नॉर्मल झालेला नाही. श्वास घ्यायला अडचण येत आहे. त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानंतरच नेमका कुठला त्रास होतोय हे सांगता येईल, असं रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितलं.
'त्याच्याशिवाय जगणं मुश्किल', सर्वात प्रिय व्यक्ती दूर गेल्याने मलायका भावुक
गेली 54 वर्षं सायरा बानू दिलीप कुमार यांची पत्नी म्हणून त्यांना साथ देत राहिल्या. दोनच महिन्यांपूर्वी 7 जुलैला दिलीप कुमार यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं. सायरा बानू 76 वर्षांच्या आहेत. त्या दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत होत्या.
पती दिलीप कुमार यांच्या देहावसानानंतर सायरा बानू एकांतातच होत्या, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. गेल्या आठवड्यापासून त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी जास्त सुरू झाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Dilip kumar