• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘सायरा बानो यांचं ते वाक्य ऐकून जीवच गेला असता’; धर्मेंद्र यांनी सांगितला धक्कादायक अनुभव

‘सायरा बानो यांचं ते वाक्य ऐकून जीवच गेला असता’; धर्मेंद्र यांनी सांगितला धक्कादायक अनुभव

“माझा आणखी एक मित्र मी गमावला”, असं म्हणत आपलं दु:ख व्यक्त केलं. सोबतच त्यांनी एक थक्क करणारा अनुभव देखील सांगितला.

 • Share this:
  मुंबई 9 जुलै: बॉलिवूडचे ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वसामान्य चाहत्यांसोबतच देशभरातील सेलिब्रिटींनी देखील त्यांच्यासोबतचे फोटो आणि आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Dilip kumar passed away) दरम्यान बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांनी देखील “माझा आणखी एक मित्र मी गमावला”, असं म्हणत आपलं दु:ख व्यक्त केलं. सोबतच त्यांनी एक थक्क करणारा अनुभव देखील सांगितला. धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेतलं. त्यावेळी घडलेला एक प्रसंग त्यांनी ट्विटरद्वारे शेअर केला. ज्या वेळी ते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचं सांत्वन करत होते. त्यावेळी त्या अचानक म्हणाल्या, पाहा साहेबांच्या पापण्या हलत आहेत. त्यांचं ते वाक्य पाहून माझा जीवच गेला असता असा अनुभव धर्मेंद्र यांनी सांगितला. सोबतच “त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना” असं ट्विट करत त्यांनी आपल्या खास मित्राला श्रद्धांजली अर्पण केली. Hot मलायकाचा Monochrome अवतार; 25 वर्षांपूर्वी या फोटोंनी उडवली होती खळबळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; 'माझा पुरस्कार' देत केला सन्मान दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 ला पेशावरमध्ये झाला होता. त्यांनी 1944 मध्ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दित त्यांनी 65 चित्रपटांत काम केलं. दिलीपकुमार यांचा अभिनय असा होता की त्यांना अभिनयाचं विद्यापीठ म्हटलं जायचं. नया दौर, मुघल-ए-आझम, राम और शाम, गंगा-जमुना, कर्मा सौदागर असे एकापेक्षा एक चित्रपट त्यांनी दिले. अभिनेत्री सायरा बानोशी त्यांनी निकाह केला. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाझ देऊन गौरवण्यात आलं होतं.
  Published by:Mandar Gurav
  First published: