जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Pooja Sawant : पूजाला मिळाला पुण्यातील प्रसिद्ध गणपतीच्या आरतीचा मान; पाहा व्हिडीओ

Pooja Sawant : पूजाला मिळाला पुण्यातील प्रसिद्ध गणपतीच्या आरतीचा मान; पाहा व्हिडीओ

Pooja Sawant

Pooja Sawant

अभिनेत्री पूजा सावंतने प्रसिद्ध गणपतीला भेट दिली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवरून त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 सप्टेंबर: सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. दोन वर्षांनंतर यावर्षी कोणत्याही नियमांशिवाय गणेशोत्सव साजरा केला  सर्वचजण बाप्पाच्या नादात रंगले आहेत. यंदाचा गणेशोत्सव 31 ऑगस्ट गणेश चतुर्थीपासून सुरू झाला आहे. तेव्हापासून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. मराठी कलाकार सुद्धा प्रचंड उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत. अनेक कलाकार गणेशाच्या दर्शनासाठी विविध ठिकाणी हजेरी लावत आहेत. फोटो शेअर करत गणेशोत्सवाचे अनुभव, जुन्या आठवणी शेअर करताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेत्री पूजा सावंतनेदेखील प्रसिद्ध गणपतीला भेट दिली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवरून त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. पूजाने पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक भाऊसाहेब रंगारी या गणपतीला भेट दिली आहे. विशेष म्हणजे तिला या गणपतीची आरती करण्याचा देखील मान मिळाला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती या गणपतीची आरती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे कि, ’ हिंदुस्थानातील पहीला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, ह्या बाप्पाची महाआरती करण्याचा योग माझ्या नशिबी आला तसच मला भाऊसाहेब रंगारी भवनाला सुद्धा भेट देता आली'.

जाहिरात

पूजा यावेळी पारंपरिक वेषात दिसून आली. सुंदर गुलाबी रंगाची पैठणी तसेच नाकात नाथ असा तिचा साज होता. पूजा सावंतआधी प्राजक्ता माळी हिला भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती करण्याचा मान मिळाला होता. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती  दिली होती. हेही वाचा - Prarthana Behere : ‘के दिल अभी भरा नहीं’; प्रार्थनाने नेहा कामत म्हणून केलेली शेवटची पोस्ट चर्चेत पूजाचा ‘दगडी चाळ 2’ हा चित्रपट नुकतंच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटातील तिचं पात्र खूपच लोकप्रिय झालं आहे. तिला ‘कलरफुल’ हि नवीन ओळख मिळाली आहे. या चित्रपटात पूजा सावंतसोबत अंकुश चौधरी आणि मकरंद देशपांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘दगडी चाळ 2’ चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. तसेच येणाऱ्या काळात पुजा सावंत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत झळकणार आहे. पूजा आणि सिद्धार्थच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘काँग्रॅच्युलेशन्स’ असं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलदेखील दिसणार आहेत.नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं आहे. पूजाला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात