जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Brahmastra Review: 9 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर बनलाय 'ब्रह्मास्त्र'; समोर आला सिनेमाचा फर्स्ट रिव्ह्यू

Brahmastra Review: 9 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर बनलाय 'ब्रह्मास्त्र'; समोर आला सिनेमाचा फर्स्ट रिव्ह्यू

Brahmastra Review: 9 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर बनलाय 'ब्रह्मास्त्र'; समोर आला सिनेमाचा फर्स्ट रिव्ह्यू

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ चा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ आज रिलीज झाला आहे. त्यासोबतच चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी प्रेस आणि समीक्षकांसाठी प्रिव्ह्यू ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता काही रिव्ह्यू समोर आले आहेत. यामध्ये चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन व्हरायटीने ‘ब्रह्मास्त्र’चा रिव्ह्यू शेअर केला आहे. ज्यामध्ये समीक्षकांनी ब्रह्मास्त्रला सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली दिसून आली आहे. या रिपोर्टमध्ये ब्रह्मास्त्रला ‘भव्यदिव्य सुपरहिरो’ असं संबोधलं आहे. तसेच प्रसिद्ध चित्रपट समीक्षक कर्टनी हॉवर्ड यांनी आलिया आणि रणबीरचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर या पती-पत्नीला त्यांनी ‘चार्मिंग आणि आकर्षक’ म्हटलं आहे. व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटात मुख्य आलिया भट्ट आणि रणबीर कपूर फारच आकर्षक दिसत आहेत.या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या खिळवून ठेवण्यास मदत होईल. या चित्रपटात रणबीर कपूरच्या तोंडातून आपल्याला अनेक दमदार डायलॉग ऐकायला मिळतात. तर दुसरीकडे आलिया भट्ट सौंदर्य आणि शक्तीची अनुभूती देते. या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीरने आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. या रिपोर्टमध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्या कामाचं देखील कौतुक करण्यात आलं आहे. मात्र शाहरुखबाबत कोणताही संदर्भ दिलेला नाहीय. **(हे वाचा:** महाकाल मंदिरात विरोधानंतर रणबीर पोहोचला लालबागच्या राजाच्या चरणी; समोर आला VIDEO ) ‘ब्रह्मास्त्र’साठी अयान मुखर्जीने तब्बल 9 वर्षे मेहनत घेतली आहे. हा चित्रपट खास बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा प्रचंड वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भेट झाली होती. त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते.चित्रपट रिलीजपूर्वीच त्यांनी लग्नदेखील केलं. आणि आता हे सेलिब्रेटी कपल आईबाबादेखील बनणार आहेत. त्यामुळे या दोघांसाठी हा चित्रपट फारच खास आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये या चित्रपटाला नकारात्मक समीक्षण मिळालं आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचण्यास कितपत यशस्वी होतो. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात