मुंबई, 9 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर भट्टने आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं आहे. हे दोघे पती-पत्नी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. आज अखेर हा बहुप्रतीक्षित चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तत्पूर्वी काल रणबीर कपूरने अयान मुखर्जीसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. सध्या त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी रणबीर गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचला होता. त्याच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक आणि त्याचा मित्र अयान मुखर्जीसुद्धा उपस्थित होता. यावेळी रणबीर पारंपरिक पोशाखात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. तसेच अयानही पारंपारिक लुकमध्ये दिसून आला. दोघांनीही यावेळी कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता.विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रणबीर कपूर आणि अयान मुखर्जीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी चाहत्यांना हात वर करुन अभिवादन करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारात रणबीरची अभिनेता सोनू सूदसोबत भेट घडून आली. रणबीरने मोठ्या श्रद्धेने लालबागच्या राजाच दर्शन घेतलं. दरम्यान रणबीर लालबागच्या दर्शनासाठी येण्यापूर्वी त्याला आणि पत्नी-अभिनेत्री आलिया भट्टला उज्जैनच्या महाकाल मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.त्यामुळे या सेलिब्रेटी कपलला महाकालचं दर्शन न घेताच परतावं लागलं होतं.
**(हे वाचा:** Koffee With Karan 7: कतरिना कैफमध्ये आहे ‘ही’ वाईट सवय; शाहिद कपूरच्या भावाचा खुलासा ) काय आहे नेमकं प्रकरण- रणबीर कपूरने काही वर्षांपूर्वी एका वक्तव्यात सांगितलं होतं की, त्याला बीफ खायला आवडतं. रणबीरच्या या वक्तव्यावर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी आक्षेप घेत महाकाल मंदिराबाहेर निदर्शने करत त्यांना काळे झेंडे दाखवले. आणि रणबीर कपूर आणि आलिया भट्टला दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलं होतं.