मुंबई, 14 एप्रिल : 2020 हे वर्ष अनेक वाईट आठवणींनं लक्षात राहिलं आहे. हे वर्ष पूर्ण कोरोनाच्या महासाथीमध्ये गेलं. तर दुसरीकडे अनेक बॉलिवूड कलाकारांनी जगाचा निरोप (bollywood stars death) घेतला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (sushant singh rajput death) तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन चर्चेत आलं. तसंच सोशल मीडियावर अनेक वादविवाद सुद्धा झाले. आता याच पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. सुशांतच्या मृत्यूबाबतचा घटनाक्रम यात रेखाटण्यात आला आहे. ‘न्याय द जस्टीस’ (Nyay The Jusitce ) असं या चित्रपटाचं नाव आहे. याचा 58 सेकंदाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे चाह्त्यांचीही उत्कंठा वाढली आहे. 14 जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली होती. सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून आहे असं म्हटलं जातं होतं. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. अनेकांची चौकशीसुद्धा झाली होती. यात सर्वात जास्त चर्चेत होती ती म्हणजे सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती. सुशांतला ड्रग्स देण्यापासून ते सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यापर्यंत असे अनेक आरोप रियावर होते.
त्यांनतर या प्रकरणाला वेगळं वळणं लागलं आणि बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं. यामध्येसुद्धा अनेक सेलिब्रिटींची चौकशी झाली. तसंच रिया आणि तिच्या भावला अटकसुद्धा झाली होती. बॉलिवूडमधील घराणेशाहीसुद्धा चर्चेत आली होती. यावेळी फक्त बॉलिवूडच नव्हे तर संपूर्ण देशातील वातावरण नकारात्मक बनलं होतं. हे वाचा - कोरोनाचा फटका बॉलिवूडला; लॉकडाउनमुळं 15 दिवस शूटिंग राहणार बंद सुशांतशी संबंधित हा संपूर्ण घटनाक्रम उलगडणारी ही फिल्म न्याय द जस्टीस. ब्रेकिंग न्यूजने या फिल्मच्या टीझरची सुरुवात होते. सुशांतच्या मृत्यूवेळी जसं त्याच्या पंख्याला अडकवलेल्या ओढणीची चर्चा झाली होती. तशीच पंख्याला अडकवलेली ओढणी यातसुद्धा दाखवण्यात आली आहे. या टिझरमध्ये सुशांत आणि रियाचं नातं दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात सुशांतच्या भूमिकेत अभिनेता जुबेर हा आहे. तर रियाच्या भूमिकेत अभिनेत्री श्रेया शुक्ला आहे. या चित्रपटात सुशांतचं नाव बदलून महेंद्र उर्फ माही असं ठेवण्यात आलं आहे. तर रियाचं नाव उर्वशी ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अमन वर्माने ईडी चीफ, असरानी, शक्ती कपूर एनसीबी चीफ, आनंद जोग मुंबई पोलीस कमिशनर, सुधा चंद्रन सीबीआय चीफ, सोमी खान बॉलिवूड मॅनेजर, अरुण बक्षी फिल्ममेकर अशा भूमिका निभावल्या आहेत. हा चित्रपट 11 जूनला प्रदर्शित होणार आहे. हे वाचा - सुपरहिट अन्नियनचा येतोय रिमेक; हा बॉलिवूड अभिनेता साकारणार मुख्य भूमिका टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सुशांतचा चाहता असणारा आणि एक समाजसेवक मनिष मिश्रा यानं चित्रपटावर पुराव्याशी छेडछाड केल्याचा आणि सुशांतची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप लावला होता.