Home /News /entertainment /

'99 songs' च्या रिलीजआधी ए. आर. रहमान यांचं प्रेक्षकांना गिफ्ट; पाहा स्पेशल कॉन्सर्टचा VIDEO

'99 songs' च्या रिलीजआधी ए. आर. रहमान यांचं प्रेक्षकांना गिफ्ट; पाहा स्पेशल कॉन्सर्टचा VIDEO

ए. आर. रहमान (A. R. Rehman) यांची फिल्म 99 songs 16 एप्रिलला रिलीज होणार आहे.

    मुंबई, 14 एप्रिल : 2021 मध्ये बॉलिवूडमध्ये खूपच चांगल्या चांगल्या उपक्रमांची घोषणा होत आहे. त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rehman) यांची बहुप्रतीक्षित फिल्म 99 songs. 16 एप्रिलला ही फिल्म रिलीज होणार आहे. त्याआधीच रहमान यांनी ’99 सॉंन्ग्स’ (99 songs) चा खास कॉन्सर्ट (99 songs digital concert) प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाबद्दल माहिती देण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं. 99 सॉंन्ग्स या चित्रपटाची ओळख प्रेक्षकांना करून देण्यासाठी या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ए.आर.रहमान यांच्यासोबत चित्रपटाचा अभिनेता ईहान भट्ट आणि दिग्दर्शक विश्वेश कृष्णमूर्ती यांनीसुद्धा यात सहभाग घेतला होता. हा एक डिजिटल कार्यक्रम होता. हा कार्यक्रम हिंदी, तामिळ,तेलुगुमध्ये डब करण्यात आला होता. याबद्दल बोलताना ए.आर.रहमान यांनी म्हटलं, 'या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी प्रत्येक शहर आणि प्रत्येक कॉलेजमध्ये जावं. तिथं जाऊन सादरीकरण करावं,  असं मला वाटत होतं. मात्र सध्याची परिस्थिती बघता हे करणं शक्य नाही. त्यामुळे डिजिटल माध्यमातून हे करावं लागतं आहे. या चित्रपटात एक अविश्वसनीय गायक आणि संगीतकारांच्या सोबत एक कार्यक्रम सादर करत आहेत. मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण या चित्रपटाला नक्की प्रेम द्याल' हा चित्रपट 99 च्या गाण्याचा संगीतमय रोमान्स आहे. याचं दिग्दर्शन विश्वेश कृष्णमुर्ती यांनी केलं आहे. या चित्रपटात ईहान भट्ट, एडील्सी वर्गीस, तिब्बसी त्याचबरोबर तेनजीन दलहा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात मनीषा कोईराला, लिसा रे, आदित्य सील, संगीतकार रंजित बारोट यांनीसुद्धा सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. हे वाचा - Nyay The Justice : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी फिल्मचा टिझर; उलगडणार अनेक 'राज' 19 फेब्रुवारी 2020 ला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याची सुरुवात पियानोमधून वाकून बघणाऱ्या मुलाच्या दृश्याने होते. त्यात अभिनेता ईहान भट्ट म्हणतो 'मला असं वाटतं एका गाण्याने  पूर्ण जग बदलू शकतो, तर त्यावर अभिनेत्री लिसा रे म्हणते संगीत हा जगातील शेवटचा जादू राहिला आहे.  कोरोनामुळे या चित्रपट प्रदर्शनात विलंब होतं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: A. R. Rahman, Bollywood

    पुढील बातम्या