Home /News /entertainment /

'क्षितीज प्रसादबरोबर गैरव्यवहार नाही', करण जोहरचे नाव घेण्यास सांगितल्याचा आरोप NCB ने फेटाळला

'क्षितीज प्रसादबरोबर गैरव्यवहार नाही', करण जोहरचे नाव घेण्यास सांगितल्याचा आरोप NCB ने फेटाळला

NCB ने ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या धर्माटिक एंटरटेनमेंटचा माजी कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसादबरोबर गैरव्यवहार केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. हे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे एनसीबीने म्हटले आहे.

    मुंबई, 29 सप्टेंबर : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या धर्माटिक एंटरटेनमेंटचा माजी कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसादबरोबर गैरव्यवहार केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. धर्माटिक इंटरटेनमेंट करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या सहयोगी कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. दरम्यान हे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. एनसीबीने एका प्रेस रिलिजमध्ये सांगितले की, प्रसादचे वकील सतिश मानेशिंदेंनी केलेले आरोप चुकीचे आहेत. क्षितीज रवी प्रसादला शनिवारी ड्रग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. क्षितीज प्रसादने एनसीबीवर गंभीर आरोप लावले आहेत. प्रसादचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रविवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसादला ब्लॅकमेल केलं आणि त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. 3 ऑक्टोबरपर्यंत प्रसाद एनसीबी कस्टडीत असणार आहे. क्षितीजच्या वकिलांनी केलेले सर्व आरोप एनसीबीने फेटाळले आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) मध्ये समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग कनेक्शनमध्ये त्याचे नाव समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर एनसीबीने असा आरोप ठेवला आहे की, आरोपीने करमजीत सिंह आनंद आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून ड्रग खरेदी केले होते. (हे वाचा-SSR Death Case : 'CBI आणि एम्स एकमेकांशी सहमत मात्र आणखी चर्चेची आवश्यकता') शनिवारी क्षितीज प्रसादने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्याला धमकावल्याचा आरोप केला होता. त्याने असा आरोप केला आहे की, वानखेडे यांनी त्याला धमकावले की स्टेटमेंटवर स्वाक्षरी न केल्यास ना त्याला त्याच्या कुटुंबीयांशी बोलता येईल ना ही त्याच्या वकिलांशी. 50 तास त्याला टॉर्चर कऱण्यात आले असे देखील क्षितीजच्या वकिलांनी म्हटले आहे. यानंतर जबरदस्तीने त्याची सही घेण्यात आली, असा आरोप मानेशिंदेंनी केला आहे. सतीश मानेशिंदे यांनी असे म्हटले आहे की, एनसीबीचे संपूर्ण अटकसत्र, बनावट तपासणी आणि नोंदवण्यात आलेले जबाब एकाच गोष्टीकडे इशारा करतात की एनसीबीला करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शनला यामध्ये फसवायचे आहे. (हे वाचा-'ते' नमुने का घेतले नाही? सुशांत सिंह राजपूत प्रकरणी AIIMS हॉस्पिटलचा थेट सवाल) ते पुढे म्हणाले की, क्षितीज प्रसादला चौकशीदरम्यान करण जोहर आणि त्यांचे टॉप एक्सीक्युटिव्ह यांना अडकविण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. वकील मानशिंदे यांनी प्रसादचा हवाला देत कोर्टात सांगितले की, 'NCB चे अधिकारी म्हणाले की, जर प्रसादने करण जोहर, सोमेल मिश्रा, राखी, अपूर्वा, नीरज वा राहिल यांचं नाव घेतलं तर ते त्याला सोडून देतील.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या