मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया, 'त्याच्या जन्मासाठी व्रत केलं होते पण...'

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया, 'त्याच्या जन्मासाठी व्रत केलं होते पण...'

अभिनेता सुशांत सिंंह राजपूतच्या निधनानंतर 12 दिवसांनी त्याच्या वडिलांनी मौन सोडले आहे. त्यांची प्रतिक्रिया हृदय पिळवटून टाकणारी आहे.

अभिनेता सुशांत सिंंह राजपूतच्या निधनानंतर 12 दिवसांनी त्याच्या वडिलांनी मौन सोडले आहे. त्यांची प्रतिक्रिया हृदय पिळवटून टाकणारी आहे.

अभिनेता सुशांत सिंंह राजपूतच्या निधनानंतर 12 दिवसांनी त्याच्या वडिलांनी मौन सोडले आहे. त्यांची प्रतिक्रिया हृदय पिळवटून टाकणारी आहे.

मुंबई, 26 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) 12 दिवसांपूर्वी या जगाला अलविदा केलं. पण त्याच्या जाण्याने आजही त्याचे चाहते, मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सहकलाकार हळहळत आहेत. दरम्यान सुशांतचे वडिल केके सिंह (KK Singh) यांनी आजतागायत कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अभिनेता सुशांत सिंंह राजपूतच्या निधनानंतर 12 दिवसांनी त्याच्या वडिलांनी मौन सोडले आहे. त्यांची प्रतिक्रिया हृदय पिळवटून टाकणारी आहे. केके सिंह यांना त्यांच्या मुलाचा खूप अभिमान होता, त्याच्या प्रतिभेबाबत त्यांनी कधीच शंका नव्हती. पण त्यांना दु:ख याचं आहे की ते त्यांच्या मुलाचं दु:ख समजू शकले नाहीत. त्यांना कळू शकलं नाही की त्यांचा मुलगा कोणत्या गोष्टीमुळे आतल्या आत दु:खी होता. तब्बल 12 दिवसांनंतर सुशांतच्या आठवणीबाबत ते बोलले आहेत.

(हे वाचा-केवळ 'या' अभिनेत्रीने केली विचारपूस, सुशांतच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया)

त्यांनी एका मुलाखतीमध्ये अशी प्रतिक्रिया दिली आहे की, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने सुशांतच्या जन्मासाठी व्रत केले होते. ते म्हणाले की, 'त्याच्या जन्मासाठी आम्ही व्रत केले होते. 3 वर्ष व्रत केल्यानंतर सुशांतचा जन्म झाला होता. 4 मुलीनंतर तो एकटा मुलगा होता. त्याच्यासाठी व्रत केले होते पण ज्याच्यासाठी व्रत केले जाते त्याच्याबरोबर हे असंच काहीतरी होतं. आणि तेच झालं. तो आम्हाला सोडून निघून गेला.'

(हे वाचा-VIDEO : वडिलांनी सुशांतला दिला होता खास जीवनमंत्र, अभिनेत्याने केला होता खुलासा)

ते पुढे म्हणाले की, 'जे होणार असतं ते आपण टाळू नाही शकत. त्यानी काही दिवसातच खूप काही केले होते. मात्र शेवटच्या दिवसात काय झाले कळले नाही. सुशांतने याबाबत आमच्याशी काही कधी बातचीत केली नाही. आम्ही देखील चित्रपटसृष्टीपासून फार दूर आहोत.' त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सुशांतचा बिहारसाठी खूप काही करण्याचा विचार केला होता. बिहारी लोकांच्या मदतीसाठी त्याने काहीतरी करण्याचा विचार केला होता, मात्र ती संधी त्याला मिळाली नाही. त्याने चंद्रावर देखील जमीन खरेदी केली होती. ती जमीन पाहण्यासाठी त्याने 55 लाखाचा टेलिस्कोप देखील खरेदी केला होता. त्यामधून तो त्याचा प्लॉट बघत असायचा'.

(हे वाचा-सुशांतची ती इच्छा अपूर्णच, 'छिछोरे'च्या दिग्दर्शकांना सांगितली होती मनातली गोष्ट)

सुशांतने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही. त्याचे चाहते त्याच्या मृत्यूसाठी बॉलिवूडमधील नेपोटिझमला जबाबदार राहत आहेत.

First published:

Tags: Suicide, Sushant Singh Rajput