मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांतची 'ती' इच्छा अपूर्णच राहिली, 'छिछोरे'च्या दिग्दर्शकांना सांगितली होती मनातली गोष्ट

सुशांतची 'ती' इच्छा अपूर्णच राहिली, 'छिछोरे'च्या दिग्दर्शकांना सांगितली होती मनातली गोष्ट

सुशांतनं दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याकडे सोशल मीडियावर एक इच्छा व्यक्त केली होती जी शेवटी अपूर्णच राहिली.

सुशांतनं दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याकडे सोशल मीडियावर एक इच्छा व्यक्त केली होती जी शेवटी अपूर्णच राहिली.

सुशांतनं दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याकडे सोशल मीडियावर एक इच्छा व्यक्त केली होती जी शेवटी अपूर्णच राहिली.

  मुंबई, 24 जून : सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचे फोटो आणि थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मोठ्या पडद्यावर रिलीज झालेला सुशांतचा छिछोरे हा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारीनं केलं होतं. पण सुशांतनं दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याकडे सोशल मीडियावर एक इच्छा व्यक्त केली होती जी अखेर पूर्ण होऊ शकली नाही. त्या आधीच सुशांतनं या जगाचा निरोप घेतला.

  नितेश तिवारी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर 21 जानेवारीला सुशांतच्या वाढदिवशी एक फोटो शेअर होता. जो छिछोरेच्या सेटवर काढण्यात आला होता. या फोटोमध्ये सुशांत आणि नितेश तिवारी स्क्रिनवर काहीतरी पाहून हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत नितेश तिवारी यांनी सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याच पोस्टवर सुशांतनं कमेंटमध्ये एक इच्छा व्यक्त केली होती.

  सुशांतनं लिहिलं, 'सर खूप खूप धन्यवाद. गिफ्ट म्हणून तुमच्या आणखी एका सिनेमात काम करण्याची संधी द्या.' पण आता त्याची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही.

  नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली 45 ते 58 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या छिछोरेनं बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची धमाकेदार कमाई केली होती. या सिनेमात सुशांतसोबत वरुण शर्मा आणि श्रद्धा कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमाची कथा एका मुलाची होती ज्यानं डिप्रेशनमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे वडील त्याला मृत्यूच्या दारातून परत घेऊन येतात. या सिनेमात सुशांतनं त्या वडीलांची भूमिका साकारली होती. मात्र दुर्दैव म्हणजे सुशांतनं स्वतः मात्र डिप्रेशनमध्ये तेच टोकाचं पाऊल उचललं.

  सुशांतनं 14 जूनला मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानं वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्याच्या अशा जाण्यानं त्याच्या कुटुंबासोबत चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येनंतर बरेच वाद सुरू झाले असून यासंदर्भात अद्याप पोलिस तपास सुरू आहे.

  First published:

  Tags: Bollywood, Sushant Singh Rajput