फक्त या अभिनेत्रीने केली होती सुशांतच्या कुटुंबीयांची विचारपूस, अभिनेत्याच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

फक्त या अभिनेत्रीने केली होती सुशांतच्या कुटुंबीयांची विचारपूस, अभिनेत्याच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)ला जाऊन आज 12 दिवस पूर्ण होत आहेत. त्याच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)ला जाऊन आज 12 दिवस पूर्ण होत आहेत. त्याच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. 14 जून रोजी त्याने त्याच्या मुंबईतील घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सर्वांसाठीच धक्कादायक होती. सुशांत इतक्या टोकाचा निर्णय घेईल असे कुणालाच वाटले नव्हते. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. आपल्या आवडत्या कलाकारने वयाच्या 34व्या वर्षी एक्झिट घेतल्याने चाहतेवर्ग दु:खी झाला आहे. दरम्यान अनेकजण त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. आता 12 दिवसांनंतर त्याचे वडील केके सिंह (KK Singh) यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. एका एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

(हे वाचा-VIDEO : वडिलांनी सुशांतला दिला होता खास जीवनमंत्र, अभिनेत्याने केला होता खुलासा)

अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) या दोघींव्यतिरिक्त कोणत्याही बॉलिवूड कलाकाराने त्यांची चौकशी केली नसल्याची प्रतिक्रिया सुशांतच्या वडिलांनी दिली आहे. 'बॉलिवूड तडका'शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 'सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूडमधील जे कलाकार उपस्थित होते त्यांच्यापैकी कुणी आमची विचारपूस केली नव्हती. जेव्हा मी 3 दिवस मुंबईत होतो त्यावेळी फक्त अंकिला लोखंडे भेटून गेली. अंत्यसंस्कारावेळी फक्त क्रिती सेनॉन बोलली. त्यावेळी आम्ही कुणीच काहीच बोलत नव्हतो. फक्त ती बोलत होती. क्रिती आमच्या बाजुला येऊन बसली तेव्हा कळलं सुद्धा नाही की ती क्रिती आहे. कुणीतरी सांगितलं तेव्हा कळलं ती क्रिती आहे. पण ती क्रिती होती की अन्य कुणी हे माहित नाही. पण ती सुशांतबद्दल चांगल बोलत होती.'

अंकिता बाबत बोलताना ते म्हणाले की, 'तिने मुंबईत असताना देखील त्यांची भेट घेतली होती आणि ती पटना देखील आली होती.

सुशांत सिंह राजपूतच्या अंंत्यसंस्कारावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता विवेक ओबेरॉय, ऋत्विक धनजानी, अभिनेत्री क्रिती सेनॉन उपस्थित होते.

First published: June 26, 2020, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading