जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांत राजपूत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी

सुशांत राजपूत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी

सुशांत राजपूत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी

कोर्टानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (NCB) थेट तुरुंगात जाऊन शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि दीपेश सावंत (Deepesh Sawant) या दोघांचा चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 सप्टेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh rajput) याच्या मृत्यूच्या तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवती हिला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीसह शौविक आणि दीपेश न्यायालयीन कोठडीत आहे. तिघे नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात आहेत. शौविक हा रियाचा भाऊ असून दीपेश हा सुशांत सिंह राजपूतच्या घरी कूक म्हणून काम करत होता. हेही वाचा… अबिगेल पांडे, सनम जौहरच्या घरात सापडले ड्रग्ज; आता टीव्ही कलाकारही NCB च्या रडार दुसरीकडे, मुंबईतील एका कोर्टानं गुरुवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (NCB) थेट तुरुंगात जाऊन शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि दीपेश सावंत (Deepesh Sawant) या दोघांचा चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh rajput Case)मृत्यू आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी शौविक चक्रवर्ती सध्या तुरुंगात आहे. नार्कोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सब्स्टांसेस अॅक्ट, 1985 (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985) च्या स्पेशल कोर्टासमोर एनसीबीने सांगितलं की, शौविकच्या मोबाइल फोनमधून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. शौविकचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचं एनसीबीनं कोर्टात दावा केला. शौविक हा बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे शौविक याची सखोल चौकशी व्हायला हवी. त्याचबरोबर दीपेश सावंतची देखील दुसऱ्यांचा चौकशी करणे गरजेचं असल्याचं एनसीबीनं कोर्टात सांगितलं. विशेष न्यायाधीश जी.बी गुरव यांनी एनसीबीला तळोजा तुरुंगात जाऊन शौविक आणि दीपेशची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. बॉलिवूडमध्ये ‘दम मारो दम’; NCB च्या रडारवर 50 सेलिब्रिटीज सुशांत प्रकरणात NCB ने रिया चक्रवर्तीची चौकशी केली. या चौकशीदरम्यान सुशांत व ड्रग्जच्या कनेक्शनबरोबरच अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. ही नावं ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती (rhea chakraborty), ड्रग पेडलर्ससह अन्य जणांना अटक केली आहे. सांगितले जात आहे की अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर कमीत कमी 50 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. यामध्ये बड्या निर्मात्यांबरोबरच दिग्दर्शकांचाही समावेश आहे. अमली पदार्थाबाबत तपास करीत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोनसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अन्य जणांचा चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की पादुकोनला शुक्रवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आलं आहे. एनसीबीच्या तपासादरम्यान DNSKअशी नावं समोर आली आहे. त्यामुळे आता एनसीबी त्या दिशेनं आपला तपास सुरू आहे. D म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहेत. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. 25 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे. हेही वाचा… ‘दीपिका ड्रग्ज घेत असल्यानेच डिप्रेशनमध्ये गेली, NCBला आणखी नावे देण्यात तयार’ ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचं नावही समोर आलं. सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केलं होतं. रियाने आपल्या जबाबात सांगितलं की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं.एनसीबीने आता साराला 24 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात