मुंबई, 24 सप्टेंबर : ड्रग्ज प्रकरणात (drugs) आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) च्या जाळ्यात अनेक सेलिब्रिटी अडकत आहेत. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येतात एनसीबीने हा फास आता अधिकच आवळला आहे. काही बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. तर आता टीव्ही कलाकारांचीही नावं यात समोर येत आहेत. अबिगेल पांडे (abigail pandey) आणि सनम जौहर (sanam johar) यांच्या घरी ड्रग्ज सापडले आहेत. एनसीबीने अबिगेल पांडे आणि सनम जौहर यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या घरातून मारियुआना ड्रग सापडला आहे. या दोघांचीही नावं एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांच्या चौकशीत समोर आली. आज या दोघांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. दरम्यान आज फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा आणि सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी सुरू आहे. याशिवाय अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांचीही चौकशी होणार आहे.
Panaji: Sara Ali Khan leaves for Mumbai from Goa Airport.
— ANI (@ANI) September 24, 2020
She has been summoned by Narcotics Control Bureau (NCB), Mumbai on September 26, in connection with a drug case related to Sushant Singh Rajput death case. pic.twitter.com/i1jT2BaS3B
अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही 25 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे.दीपिका गोव्याहून मुंबईसाठी रवाना झाली आहे. आता ती गोवा विमानतळावर आहे. चार्टर्ड प्लेनने ती मुंबईत येणार आहे. दीपिका आणि रकुल प्रीत सिंह यांची उद्या चौकशी होणार आहे. तसंच सारा अली खानही गोव्यात आहे. तीदेखील मुंबईकडे निघाली आहे. सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची 26 सप्टेंबरला चौकशी केली जाणार आहे. हे वाचा - बॉलिवूडमध्ये ‘दम मारो दम’; NCB च्या रडारवर 50 सेलिब्रिटीज व प्रॉड्यूसर दीपिका आणि श्रद्धा कपूर दोघींचेही ड्रग्जसंबंधी चॅट एनसीबीला सापडले. दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यामध्ये ड्रग्जबाबत बोलणं झालं होतं. तर श्रद्धा कपूरनेही मेसेजवर सीबीडी ऑइलबाबत विचारणा केली होती. तर सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केलं होतं. रियाने आपल्या जबाबात सांगितलं की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. हे वाचा - कंगनाच्या याचिकेवर उद्यापासून सुनावणी, संजय राऊतांना मात्र 1 आठवड्याची मुदत एनसीबीने रिया चक्रवर्ती (rhea chakraborty), ड्रग पेडलर्ससह अन्य जणांना अटक केली आहे. सांगितले जात आहे की अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर कमीत कमी 50 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. यामध्ये बड्या निर्मात्यांबरोबरच दिग्दर्शकांचाही समावेश आहे.