फिल्मी मुंबई, 30 जून- दूरदर्शनवरील ‘शांती’ (Shanti) या मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या मंदिरा बेदीने (Mandira Bedi) टीव्ही क्षेत्रात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. क्रिकेट असो बॉलिवूड असो किंवा छोटा पडदा सर्वच क्षेत्रात मंदिराने आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र ही अभिनेत्री एका दिग्दर्शकाच्या प्रेमात कशी पडली हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया राज कौशल (Raj Kaushal) आणि मंदिरा बेदी यांची लव्हस्टोरी (Love story) कशी सुरु झाली होती.
View this post on Instagram
मंदिरा बेदी आणि पती दिग्दर्शक राज कौशल यांची पहिली भेट, दिग्दर्शक मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. त्यावेळी मंदिराने ‘शांती’ या मालिकेमध्ये तसेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात काम केलं होतं. मंदिरा आणि राजची पहिली भेट झाली, त्यावेळी राज मुकुल आनंदसोबत चीफ असिस्टंट म्हणून काम करत होते. आणि त्यावेळी छोट्या पडद्यावरील ‘फिलिप्स 10’ या शोसाठी ऑडीशन घेत होते. आणि याचं ऑडीशनसाठी मंदिरा बेदीलासुद्धा बोलवण्यात आलं होतं. ही त्यांची पहिली भेट होती.
(हे वाचा:दिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा खालावली; ICU मध्ये केलं दाखल )
या भेटीनंतर त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या होत्या. राज यांनी एका मुलाखतीदरम्यान असं म्हटलं होतं, की मंदिरासोबतच्या 3 भेटीवेळीच मला असं वाटू लागलं होतं, की तिचं माझ्या आयुष्यातील खर प्रेम आहे. 1996 मध्ये हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते. मुकुल आनंद यांच्या घरी मंदिरा आणि राजच्या सतत भेटीगाठी होतं होतं होत्या. राजला मंदिरासोबत लग्नदेखील करायचं होतं. मात्र हे लग्न इतक सोप नव्हतं.
(हे वाचा:राज कौशल यांची ही पार्टी ठरली शेवटची; अवघ्या दोनच दिवसात आनंदावर व )
राजच्या आईवडिलांनी मंदिरा आणि त्याच्या लग्नाबद्दल आधीच होकार दिला होता. मात्र मंदिराच्या आईवडिलांनी यासाठी काही विशेष रुची दाखवली नव्हती. कारण त्यानां आपल्या मुलीचं लग्न एका दिग्दर्शकासोबत करायचं नव्हतं. आणि म्हणूनचं सुरुवातीला त्यांनी या नात्याबद्दल फारस मन दाखवलं नाही. मात्र राजच्या भेटीनंतर मंदिराच्या आई वडिलांनीसुद्धा होकार दिला होता. 1999 मध्ये अगदी व्हेलेंटाईन डेलाच या दोघांनीही आपली लग्नगाठ बांधली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Mandira bedi