मराठी बातम्या /बातम्या /देश /

अभिनेता सोनू सूदच्या बहिणीचा राजकारणात प्रवेश, पंजाबमधून लढवणार निवडणूक

अभिनेता सोनू सूदच्या बहिणीचा राजकारणात प्रवेश, पंजाबमधून लढवणार निवडणूक

मोगा शहरात सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) म्हणून त्या परिचित आहेत. सोन सूद अभिनेता आहे, तसंच मदत करणारं व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहे.

मोगा शहरात सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) म्हणून त्या परिचित आहेत. सोन सूद अभिनेता आहे, तसंच मदत करणारं व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहे.

मोगा शहरात सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) म्हणून त्या परिचित आहेत. सोन सूद अभिनेता आहे, तसंच मदत करणारं व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहे.

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर: प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) याने त्याची धाकटी बहीण मालविका सूद-सच्चर (Malvika Sood - Sachar) राजकारणात प्रवेश करत असल्याची आणि 2022 साली निवडणूक (Election) लढवणार असल्याची घोषणा 14 नोव्हेंबर रोजी केली. मालविका सूद-सच्चर नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप नक्की झालं नसल्याचं त्याने सांगितलं; मात्र ती सध्या वास्तव्यास असलेल्या मोगा (Moga) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. अभिनेता सोनू सूदच्या तीन भावंडांपैकी मालविका सूद-सच्चर (वय 38) सर्वांत धाकट्या आहेत. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. मोगा शहरात सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) म्हणून त्या परिचित आहेत. सोन सूद अभिनेता आहे, तसंच मदत करणारं व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहे. सोनूची सर्वांत मोठी बहीण मोनिका शर्मा फार्मास्युटिकल व्यवसायात असून, त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. आई-वडील शक्तिसागर सूद आणि सरोजबाला सूद यांच्या स्मरणार्थ मालविका आणि सोनू सूद यांच्यातर्फे सूद चॅरिटी फाउंडेशन चालवलं जातं. शक्तिसागर सूद यांचं 2016 साली, तर सरोजबाला सूद यांचं 2007 साली निधन झालं आहे. हेही वाचा-  पॅराशूट रायडिंग करताना जोडप्याचा तुटला दोरखंड; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
 माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मालविका सूद-सच्चर या कम्प्युटर इंजिनीअर (Computer Engineer) आहेत. त्या मोगा येथे आयईईएलटीएस (IEELTS) कोचिंग सेंटर चालवतात. तसंच गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजीचं मोफत शिक्षण देतात. त्यांचा विवाह शिक्षणतज्ज्ञ गौतम सच्चर यांच्याशी झाला असून, हे दांपत्य फाउंडेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या धर्मादाय प्रकल्पांची देखभाल करतात. `आम्ही देशभरातल्या 20,000 पेक्षा जास्त वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत असून, गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठीही निधी देत आहोत,` असं गौतम सच्चर यांनी सांगितलं.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या (Lockdown) काळात मालविका यांनी वंचित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गांचं मोफत आयोजन केलं होतं. त्यांचे वडील मोगा शहराच्या मुख्य बाजारात बॉम्बे क्लॉथ हाउस नावाचं दुकान चालवत. त्यांच्या मातोश्री मोगा शहरातल्या डीएम महाविद्यालयात इंग्रजीच्या लेक्चरर होत्या. महामारी काळात मोगामध्ये या बहीण-भावांनी गरजू विद्यार्थी आणि मजुरांसाठी शेकडो सायकलींचं वाटप केले. मालविका यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून मोगा शहरात 'माझं शहर, माझी जबाबदारी अभियान' सुरू केलं होतं. हेही वाचा-  बिहारमध्ये केवळ 22 वर्षीय तरुण पत्रकाराची हत्या, नेमकं कारण काय? प्रेमाचा त्रिकोण की...
 `पंजाबी असल्याचा मला खूप अभिमान आहे. गरजूंची सेवा करण्याची मूल्यं आई-वडिलांनी माझ्यात रुजवली. माझा भाऊ सोनू सूद यानं कोरोना काळात प्रवाशांना मदत केली. त्यांचं दुःख पाहवत नसल्यानं मदत करण्याचा निर्णय त्यानं घेतला. ही पालकांनी दिलेली शिकवण आहे,` असं मालविका सूद-सच्चर यांनी सांगितलं.
`माझी बहीण मालविका पंजाबमधल्या (Punjab) नागरिकांची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. आमच्या कुटुंबाला लोकांनी जे प्रेम आणि आदर दिला, त्याची परतफेड म्हणून तिने पंजाबमधल्या नागरिकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोगा शहरात आम्ही मोठे झालो. त्यामुळे या शहरातून ती निवडणुकीच्या रिंगणात उतरेल,` असं सोनू सूदनं सांगितलं.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Sonu Sood

पुढील बातम्या