Home /News /entertainment /

'रिया को फसाओ असा ड्रामा सुरू', अभिनेत्रीसाठी बॉलिवूडचे दिग्गज एकवटले; माध्यमांना खुले पत्र

'रिया को फसाओ असा ड्रामा सुरू', अभिनेत्रीसाठी बॉलिवूडचे दिग्गज एकवटले; माध्यमांना खुले पत्र

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) बाबत माध्यमांचा व्यवहार अगदी चुकीचा असल्याचे सांगत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी माध्यमांना खुले पत्रच लिहीले आहे. 'रिया को फसाओ'चा हा ड्रामा सुरू असल्याचं सेलिब्रिटींनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 16 सप्टेंबर : अभिनेत्री रिया चक्रवर्तीसाठी (Rhea Chakraborty)  बॉलीवूड एकवटल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. माध्यमांचा रियाबाबत असणारा व्यवहार अगदी चुकीचा असल्याचे सांगत अनेक दिग्गजांनी माध्यमांना खुले पत्रच लिहीले आहे. 'रिया को फसाओ'चा हा ड्रामा सुरू असल्याचं सेलिब्रिटींनी या पत्रामध्ये म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणात नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केल्यानंतर शांत असलेले बॉलीवूड  कलाकार अचानक रिया चक्रवर्तीच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. रिया बरोरबरचा माध्यमांचा व्यवहार पाहून हे सर्व एकजूट झाले आहेत. नुकतेच बॉलीवूडच्या काही कलाकारांनी माध्यमांना एक खुले पत्र लिहीले आहे. यात त्यांनी स्वाक्षरी करून सुशांत सिहं राजपूत मृत्यूप्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत माध्यमांद्वारा रियाशी केल्या जाणाऱ्या वागणुकीवर आक्षेप नोंदविला आहे. यात सोनम कपूर, फरहान अख्तर, जोया अख्तर, अनुराग कश्यप या सेलेब्रिटींचा समावेश आहे. (हे वाचा-जया बच्चन यांची शिवसेनेनं केली जोरदार पाठराखण, कंगनाला पुन्हा एकदा फटकारले) Feminist Voices या एका ब्लॉगपोस्टमध्ये प्रकाशित पत्रावर दिग्दर्शक अनुराग कश्यप, गौरी शिंदे, जोया अख्तर, अभिनेत्री सोनम कपूर, रसिका दुग्गल, अमृता सुभाष, मिनी माथूर, दिया मिर्झा आणि सुमारे 2500 अन्य लोकांनी स्वाक्षरी केली आहे. त्याचप्रमाणे 60 विविध संघटनांनी या पत्राचे समर्थन केले आहे. याबरोबरच पत्रात फ्रीडा पिंटो, अलंकृता श्रीवास्तव, रीमा कागती, रूचि नारायण यांनी देखील स्वाक्षरी केली आहे.  या पत्रात  सेलिब्रेटींनी असे म्हटले आहे की, ‘ माध्यमांनी बातम्यांचा पाठलाग करावा, महिलांचा नव्हे.’ काय आहे पत्रात? ''प्रिय भारतातील प्रसार माध्यमे, आम्हाला तुमची चिंता आहे. तुम्हाला ठिक वाटतेय का? कारण आम्ही माध्यमांना रिया चक्रवर्तीच्या मागे धावताना बघतो तेव्हा आम्हाला समजत नाही की तुम्ही पत्रकारितेच्या नैतिकतेचा त्याग केला आहे का? तुम्ही एका महिलेची सभ्यता आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यापेक्षा कॅमेरे घेऊन या महिलेवर हल्ला करण्यात गुंतले आहात. तुम्ही तिच्या वैयक्तिक आयुष्याचा भंग करीत आहात. 'रिया को फसाओ'चा हा ड्रामा सुरू आहे. तुम्हाला केवळ एक स्टोरी तयार करण्याची घाई आहे. एक तरूणी जी आपले  निर्णय स्वत: घेते, लग्नाशिवाय बॉयफ्रेंडबरोबर राहते आणि जी एखाद्या मजबूल स्त्रीऐवजी ती स्वत:साठी बोलत आहे. तर तिला विना चौकशी, कायदेशीर प्रक्रियेशिवाय तिला अपराधी ठरविले जाते. सलमान खान आणि संजय दत्त यांच्या प्रकरणात आम्ही तुमचे दयाळू रूप पाहिले, मात्र, जेव्हा एका महिलेवर संकट ओढवले आहे, ज्या महिलेने कोणताही अपराध केला आहे का नाही हे अजून सिद्ध व्हायचे आहे तर तुम्ही तिच्या चरित्र्यावर वारंवार हल्ले करीत आहात. तिच्या कुटुंबीयावर निशाणा साधण्यासाठी सोशल मीडियावर लोकांना भडकवत आहात. तिच्या अटकेला स्वत:चा विजय दाखवत आहात.  यामध्ये काय विजय आहे? आम्ही बघतोय की, तुम्ही रिया चक्रवर्तीच्या मागे लागलेले आहात. आम्हाला समजत नाही, पत्रकारीतेच्या प्रत्येक मुल्याचा तुम्ही त्याग का केला आहे?'' (हे वाचा-संजय दत्त अचानक मुंबईतून परदेशाला रवाना, पत्नी मान्यताही आहे सोबत!) सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आले आहे.  त्या पार्श्वभूमीवर ब्यूरोने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात एनसीबीने शौविक चक्रवर्ती आणि राजपूतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंतला प्रथम अटक केली आहे. एनसीबीने या प्रकरणात रिया सोबत 18 जणांना अटक केली आहे.

   

   
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या