मुंबई, 16 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) ला चौथ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाला आहे. 11 ऑगस्ट रोजी संजय दत्तला कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये किमोथेरपीचा पहिली टप्पा पूर्ण केला. आता संजय दत्त आपल्या पत्नीसह परदेशात रवाना झाला आहे.
फुप्फुसाचा कर्करोगावर मुंबईत उपचार घेतल्यानंतर संजय दत्त आपल्या पत्नीसह दुबईला रवाना झाला आहे. . संजूबाबाच्या प्रकृतीसाठी बॉलिवूडमधील कलाकार आणि त्याचे चाहते चिंतातूर झाले आहे.
संजय दत्त (Sanjay Dutt) आपल्या पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt)सह 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मुंबईतून दुबईला रवाना झाला. टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार, मुलं शहरान आणि इकरा संजय दत्तला भेटण्यासाठी अतूर झाले होते. त्यांना भेटण्यासाठी संजय दत्त दुबईला रवाना झाला. पुढील 7 ते 10 दिवस ते दुबईत राहणार आहे. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतणार आहे.
काही दिवसांपूर्वी संजय दत्त (Sanjay Dutt) ने स्वत: आपल्याला फुप्फुसांचा कर्करोग झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला फुप्फुसांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. कर्करोगाचे निदान झाल्यामुळे संजय दत्तने बॉलिवूडमधून कामासाठी ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.
संजय दत्त यांच्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले होते. काही वर्ष त्यांनी जेलमध्येही काढली होती. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला असल्याचं बोललं जात आहे. मात्र ते सतत कार्यमग्न होते. आता कोरोनाच्या काळात फारसं बाहेर जाता येत नाही. कामावरही बंधणं आली आहेत. त्यामुळे या काळात तब्येतीवर जास्त लक्ष देण्याचा निर्णय संजय दत्त यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.