'ते सगळं ठिकाय पण याचा मास्क कुठाय', रक्तदान करायला गेलेला सोनू निगम होतोय ट्रोल

'ते सगळं ठिकाय पण याचा मास्क कुठाय', रक्तदान करायला गेलेला सोनू निगम होतोय ट्रोल

बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक(Bollywood Singer) सोनू निगमने(Sonu Nigam) सुद्धा रक्तदान (Blood Donation) करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

मुंबई, 6मे- सध्या देशात कोरोनाने (Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. मृतांची संख्या वाढत आहे. तर प्रत्येक लोकांना मदतीची गरज भासत आहे. अशात अनेक बॉलिवूड कलाकार(Bollywood Stars)  मदतीसाठी धाव घेत आहेत. त्यामुळे समाजातून त्यांचं कौतुक होतं आहे. बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक(Bollywood Singer)  सोनू निगमने(Sonu Nigam)  सुद्धा रक्तदान (Blood Donation) करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र इथं सोनू सोबत उलट घडत आहे. त्याचं कौतुक होण्याऐवजी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. कारण रक्तदान करताना सोनू निगमने आपल्या तोंडारवर मास्कचं लावलेला नाहीय.

View this post on Instagram

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

नुकताच सोनू सूदने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेयर केला होता. हे फोटो आणि व्हिडीओ एका रक्तदान शिबिरामधील होते. कोरोना काळात मदत म्हणून सोनूने रक्तदान केलं आहे. या फोटोंमध्ये सोनू रक्तदान करताना दिसून येतं आहे. मात्र सोनूने चेहऱ्यावर अजिबात मास्कचा वापर केलेला नाहीय. त्यामुळेच नेटकरी सोनूवर संतापले आहेत.

सध्या कोरोनाचा विळखा वाढतचं चालला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहेत. कामानिमित्त सार्वजनिक ठिकाणी गेल्यास सक्तीने मास्कचा वापर करण्यास सांगितलं जातं आहे. मात्र मोठ्या कलाकारांकडूनचं असं नियमांचं उल्लंघन होतं असल्याचं पाहून युजर्स भडकले आहेत.

(हे वाचा:मराठी मालिकांना कोरोनाचा फटका; महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी  )

व्हिडीओ बद्दल सांगायचं झाल्यास, सोनू निगमने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यानं म्हटलं होतं, की आगामी काळात देशात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे तेव्हा उपाययोजना करण्यापेक्षा आत्तापासूनचं तयारीला लागा.

(हे वाचा: कोरोना काळात हॉलिवूडही भारतासाठी सरसावलं; आता जेनिफर अनिस्टनने केलं मदतीचं आवाहन )

रक्तदान करा. मीसुद्धा आज रक्तदान करण्यास जाणार आहे. मला कोरोना झाला होता. आत्ता मी रक्तदान करू शकतो. मी लस घेण्याच्या आधी हे रक्तदान करत आहे. तुम्ही सुद्धा अवश्य रक्तदान करा’. अशा आशयचा हा व्हिडीओ होता. मात्र रक्तदान केल्यानंतर सोनूचं कौतुक होण्यासोबतचं मास्क नसल्यामुळे ट्रोलसुद्धा करण्यात येत आहे.

Published by: Aiman Desai
First published: May 6, 2021, 6:49 PM IST

ताज्या बातम्या