मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कोरोना काळात हॉलिवूडही भारतासाठी सरसावलं; आता जेनिफर अ‍ॅनिस्टनने केलं मदतीचं आवाहन

कोरोना काळात हॉलिवूडही भारतासाठी सरसावलं; आता जेनिफर अ‍ॅनिस्टनने केलं मदतीचं आवाहन

हॉलिवूड अभिनेत्री (Hollywood Actress) जेनिफर अ‍ॅनिस्टनने(Jeniffer Aniston) इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) केली आहे.

हॉलिवूड अभिनेत्री (Hollywood Actress) जेनिफर अ‍ॅनिस्टनने(Jeniffer Aniston) इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) केली आहे.

हॉलिवूड अभिनेत्री (Hollywood Actress) जेनिफर अ‍ॅनिस्टनने(Jeniffer Aniston) इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) केली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 06 मे :  कोरोना महासाथीने (Corona Pandemic)  सध्या विक्राळ रूप धारण केलं आहे. दिवसेंदिवस देशाची स्थिती खालावत आहे. रुग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की त्यांना रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. याअभावी लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. सध्या देशात एकमेकांना मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे देशातील अनेक कलाकार मदतीसाठी धाव घेत आहेत. कौतुकाची बाब म्हणजे आता परदेशी कलाकारांनीसुद्धा भारताच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. अलीकडेच प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री (Hollywood Actress) जेनिफर अ‍ॅनिस्टनने (Jeniffer Aniston) सोशल मीडियावर भारताच्या मदतीसाठी आवाहन केलं आहे.

जेनिफर अ‍ॅनिस्टनने (Jeniffer Aniston) इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) केली आहे. ती म्हणाली, "सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांत आणि मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. तुम्हाला फक्त लोकांच्या मदतीसाठी पैसे नाही दान नाही करायचे आहेत, तर सोशल मध्यामांवरून जनजागृती सुद्धा करायची आहे"

याआधी सुद्धा काही हॉलिवूड कलाकारांनी पुढाकार घेतला होता. प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरी आणि केमिला कबेलो यांनीसुद्धा आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत भारताला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच सिंगर शॉन मेंड्सने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं होतं, "तुम्हाला कधीही भारतीय संस्कृती किंवा तिथल्या लोकांनी प्रभावित केलं असेल तर कृपा करून दान करा, शेअर करा किंवा तुम्हाला शक्य होईल ती मदत करा"

हे वाचा - मनोरंजनसृष्टीला पुन्हा मोठा धक्का; आता अभिनेत्याच्या भावाचा कोरोनाने घेतला ब)

केटी पेरीने आपल्या इन्स्टाग्रामवर म्हटलं आहे, "भारतात थैमान घातलेल्या महासाथीबद्दल तुम्ही ऐकलं असेल. कोरोनाची ही लाट विश्वविक्रम करत आहे. भारतात माझे मित्र ऑक्सिजन कन्टेनर पोहचवण्यात गुंतले आहेत. जर तुम्हालाही मदत करायची असेल तर त्याची लिंक माझ्या इन्स्टा बायोमध्ये आहे"

हे वाचा - Rashmi Rocket चा एडिटर अजय शर्माचा कोरोनाने मृत्यू; मागितला होता ऑक्सिजन बेड  )

तर दुसरीकडे सिंगर केमिला कबेलोने पोस्ट लिहून खंत व्यक्त केली होती, तिनं म्हटलं होतं, "भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यामुळे भारताची मदत करण्यासाठी साधनांची आणि आपल्या सहकार्याची गरज आहे"

First published:

Tags: Corona virus in india, Hollywood, Instagram post, Marathi entertainment